ट्रॅक्टर ट्रॉलीचा हीच तुटल्याने युवा मजुराचा मृत्यु accident

Apghat
Apghat

नागभीड तालुक्यातील सावरगाव येथील घटना

तळोधी (बा) (प्रतिनिधी) : तळोधी(बा.) पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सावरगाव येथील शेतमजुर युवकाचा धानाचे पोते भरून असलेल्या चालू ट्रॅक्टर ट्रॉली वरून पडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवार 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता दरम्यान घडली. Young farmer dies in accident देविदास पुंडलिक बोरकर (वय 35) असे मृतक युवकाचे नाव असून तो सावरगाव येथील रहिवासी आहे. Devidas Borkar

सावरगाव येथील ट्रॅक्टर मालक-चालक बाबुराव ऋषी ठिकरे यांच्या मालकीच्या ट्रॅक्टरने धानाचे पोते दुलाई करायला गेले असता Krushi Thikre  शेतावरून धानाचे पोते घेऊन गावाकडे येत असताना चंद्रपूर-नागभीड-नागपूर मार्गावर सावरगाव येथील बॉयपास मार्गाजवळ ट्रॅक्टरला लागून असलेल्या ट्रॉली (क्र. एम. एच. 35 एफ 1016) या ट्रालीचा हीच तुटल्यामुळे पोत्यावर बसलेला युवा शेतमजूर देविदास बोरकर हा ट्रालीच्या खाली पडला. दरम्यान त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. Chandrapur Nagbhid Nagpur

घटनेची माहिती मिळतात तळोधी पोलिसांनी घटनास्थळ गाठून मोक्का पंचनामा केला व शवविच्छेदनाकरिता नागभीड ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. अधिक तपास तळोधी पोलीस करीत आहेत. मृतकाच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलें व बराच मोठा आप्तपरिवार आहे. Talodhi Police Station