नामदार सुधीर मुनगंटीवार 25985 मताने विजयी Sudhir Mungantiwar wins

Sudhir Mungantiwar wins
Sudhir Mungantiwar wins

मूल शहरात निघाली विजयी रॅली

मूल ( तालुका प्रतिनिधी ): 72 बल्लारपूर विधानसभा मतदार संघाच्या आज पार पडलेल्या निवडणूक निकालात भाजपाच्या सुधीर मुनगंटीवार यांनी कॉंग्रेसचे संतोषसिंह रावत यांना 25 हजार 985 मताने पराजीत केले. सुधिर मुनगंटीवार यांना 1 लाख 5 हजार 969 मते तर काँग्रेसचे संतोषसिंह रावत यांना 79 हजार 984 मते मिळाली. अपक्ष उमेदवार डॉ. अभिलाषा गावतुरे यांना 20 हजार 935 मतांवर समाधान मानावे लागले. Sudhir Mungantiwar wins

गेल्या 15 वर्षापासुन बल्लारपूर विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व करीत असलेल्या सुधीर मुनगंटीवार यांनी चौथांदा विधानसभा निवडणुकीत उभे होते. 20 नोव्हेंबर विधानसभा निवडणुक पार पडली, 23 नोव्हेंबर रोजी मुल येथील प्रशासकीय भवनांमध्ये सकाळी 8 वाजता पासुन निवडणुक प्रक्रिया पार पडली. यानिवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीकडुन नामदार सुधीर मुनगंटीवार तर काँग्रेसकडून संतोषसिंह रावत निवडणूक मैदानात उभे होते. पार पडलेल्या विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांना 1 लाख 5 हजार 969 मते तर काँग्रेसचे संतोषसिंह रावत यांना 79 हजार 984 मते मिळाली. अपक्ष उमेदवार डॉ. अभिलाषा गावतुरे यांना 20 हजार 935 मते मिळाली. Ballarpur constituency