23 नोव्हेबर रोजी मूल येथील प्रशासकीय भवनात पार पडणार निकाल प्रक्रिया Results process

Administrative Building
Administrative Building

बल्लारपूर विधानसभा निवडणुक

मूल़ (प्रतिनिधी): 20 नोव्हेबर रोजी पार पडलेल्या बल्लारपूर विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीचा निकाल प्रक्रिया 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता पासुन मूल येथील प्रशासकीय भवनात पार पडणार आहे. Results process

बल्लारपूर विधानसभा निवडणुकीत राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार भाजपाचे उमेदवार आहेत, तर कॉंग्रेसकडुन संतोषसिंह रावत निवडणुक रिंगणात आहेत, डॉ. अभिलाषा गावतुरे हया कॉंग्रेसच्या बंडखोर अपक्ष उमेदवार म्हणुन निवडणुक रिंगणात उतरल्या असुन त्यांचेसह 17 उमेदवार आपले नशिब अजमाविणार आहेत. नामदार सुधीर मुनगंटीवार बल्लारपूर विधानसभा मतदार संघातुन निवडणुक लढवित असल्याने संपुर्ण राज्याचे लक्ष बल्लारपूर विधानसभाकडे लागुन आहे. Ballarpur Assembly

सकाळी 8 वाजता पासुन निवडणुक निकाल प्रक्रिया मूल येथील प्रशासकीय भवनामध्ये पार पडणार आहे. यासाठी निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अजय चरडे यांच्या मार्गदर्शनाखाली इव्हीएमच्या मतमोजणीकरीता 14 टेबल, टपाली मतपत्रिका मोजणीकरीता 7 टेबल तसेच ईटीपीबीएमएस मतमोजणीकरीता 2 टेबल असे एकुण 23 टेबल मतमोजणीकरीता लावण्यात येणार आहे. इव्हीएमच्या मतमोजणी करीता 16 पर्यवेक्षक व 17 सहाय्यक, टपाली मतमोजणी करीता 8 पर्यवेक्षक व 16 सहाय्यक तसेच ईटीपीबीएमएस करीता 8 अधिकारी, कर्मचाऱ्यांची नेमणुक करण्यात आली आहे. 27 फेरीनिहाय मतमोजणी होणार आहे. तसेच इव्हीएम करीता 18 सुक्ष्म निरीक्षक व टपाली मतपत्रिका 8 सुक्ष्म निरीक्षक यांची नेमणुक करण्यात आली आहे. Sudhir Mungantiwar, Santosh Rawat, Abhilasha Gavture

अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना 22 नोव्हेंबर रोजी प्रशिक्षण देण्यात आले आहे. मतमोजणी कालावधीत कायदा व सुव्यवस्था राखण्याकरीता तिन स्तरीय बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. मतमोजणीचे ठिकाणी कुणालाही मोबाईल, डिजीटल वॉच इत्यादी इलेक्ट्रॉनिक साहित्य आणण्यास बंदी राहणार आहे. प्राधिकारपत्र असलेल्या माध्यम प्रतिनिधीसाठी मिडीया सेलची व्यवस्था केली असुन एक अधिकारी तेथे मतमोजणीची अद्यावत माहिती देण्यासाठी उपलब्ध राहणार आहेत. ध्वनी प्रक्षेपणाव्दारे प्रत्येक फेरीचा निकाल घोषीत करण्यात येणार आहे. Administrative Building