सुधीर मुनगंटीवारांच्या नियोजनामुळे वाहताहेत उद्योगवारे
मुल (प्रतिनिधी): काही वर्षांपूर्वी ज्या एमआयडीसीतील रिकामे भूखंड टीका ओढवून घेत होते, तीच मुल एमआयडीसी आज हाऊसफुल्ल झाली आहे. बल्लारपूर मतदारसंघासाठी मुल एमआयडीसी तब्बल ४ हजारांवर रोजगार देत असून येत्या काळात हा आकडा आणखी वाढणार आहे. बल्लारपूरचे आमदार व मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या अथक प्रयत्नांमुळे आज हे शक्य होताना दिसत आहे. Over 4 thousand jobs
एडव्हान्टेज चंद्रपूरसारखे इव्हेंट मोठमोठ्या कंपन्यांना आकर्षित करण्यास कारणीभूत ठरले आहेत. उद्योग जगतातून येणाऱ्या कोट्यवधींच्या गुंतवणुकीमुळे बल्लारपूरचे भविष्य उद्योगमय विश्वात उज्ज्वल होत आहे. रस्ते, पाणी, वीज या मूलभूत सुविधांसह स्थानिकांना रोजगारांच्या नवनव्या संधी निर्माण झाल्या आहेत. आणि भविष्यातही सातत्याने विकासाच्या वाटेवर धावण्यासाठी भाजपाचे आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार गेली अनेक वर्षे करत असलेल्या प्रयत्नांचे हे यश आहे. Sudhir Mungantiwar
कंपनीचे नाव – गुंतवणूक (कोटी रु.) – रोजगार संख्या
१. मे. जी. आर. किष्णा फेरो अलाईड प्रा. लि. – ७४० – ६५०
२. मे. महिला आर्थिक विकास महामंडळ – ६३५ – २५०
३. मे. ग्रेटा एनर्जी लि. – ६०० – ४०
४. मे. भाग्यलक्ष्मी मेटल प्रा. लि. – ४५२.४ – ७५०
५. मे. पृथ्वी एलाईज प्रा. लि. – ४१० – ७५०
६. मे. चिंतामणी फॅब्रिकेशन प्रा. लि. – ३५० – ९३०
७. मे. कार्निवल इंडस्ट्रिज प्रा. लि. – १७६.५० – ४२५
८. मे. दिनानाथ अलाईड स्टील – १६० – १००
९. मे. राजुरी स्टील प्रा. लि. – ११४.३९ – ७८०
१०. मे. सॉइलॉन स्टील प्रा. लि. – ६५ – १२०
त्यामुळे, सुधीरभाऊंनी ज्या उपेक्षित बल्लारपूरला विकासाच्या नकाशावर आणण्यासाठी अपार मेहनत घेतली आहे, तो विकास असाच पुढे होत राहणे गरजेचे आहे. सुधीरभाऊंशिवाय बल्लारपूरचे चित्र बदलण्याचा विचारही करता येतो का? त्यामुळे, विचार करा आणि मतदान करा! Ballarpur Assembly