ट्रकच्या धडकेत आरोग्य सेविकेचा मृत्यु accident

Mandatai Tirupati Karpalliwar
Mandatai Tirupati Karpalliwar

चांदापूर फाटयाजवळील घटना

निनाद शेंडे, मूल : तालुक्यातील जुनासुर्ला येथे कर्तव्यावर जात असताना विरूध्द दिशेने येणाऱ्या ट्रकने थांबुन असलेल्या  आरोग्य सेविकेच्या  वाहनाला धडक दिल्याने ति जागीच ठार झाल्याची घटना चांदापूर फाटयावर बुधवारी दुपारी 3 वाजता दरम्यान घडली. Health worker मंदाताई तिरूपती करपल्लीवार वय 45 वर्षे रा. मूल असे वाहनाच्या धडकेत ठार झालेल्या महिलेचे नांव आहे. Mandatai Tirupati Karpalliwar

मूल तालुक्यातील जुनासुर्ला येथे मंदाताई तिरूपती करपल्लीवार हया कंत्राटी आरोग्य सेविका म्हणुन कार्यरत होत्या. त्या दुपारी 2 वाजता दरम्यान जुनासुर्ला येथे कर्तव्यावर जाण्यासाठी दुचाकी क्रमांक एम एच 34 ए एक्स 9370 हा वाहनाने जात होत्या. दरम्यान त्या चांदापूर फाटयावर थांबुन असताना गोंडपिपरीवरून मूल कडे येत असलेल्या ट्रक क्रं. एम एच 40 सी टी 5327 यावाहनाने दुचाकीला जबर धडक दिल्याने मंदाताई करपल्लीवार हया जागीच ठार झाल्या. Health worker dies in truck collision घटनेची माहिती मूल पोलीस स्टेशनला मिळताच मूल पोलीस स्टेशनचे पथक घटनास्थळी दाखल होवुन पंचनामा केला व मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आले. Junasurla, Chandapur

मूल पोलीसांनी ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला असुन ट्रक ताब्यात घेतले आहे. ट्रक चालक फरार आहे. सदर ट्रक सुरजागड वरून भंडाराकडे जात असल्याची प्राथमिक माहिती आहे. Mul Police