काँग्रेस निरीक्षक जाफर शेख यांचा आरोप
मूल (प्रतिनिधी) : काॅंग्रेस पक्षाला इतिहास असून बलीदानकर्त्यांचा पक्ष म्हणून ओडख आहे. संविधान बदलवू पाहणारे जातीयवादी पक्ष चारशे पार न गेल्याने होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण ही फसवी योजना घेवून भगिनींची दिशाभूल करीत आहेत. Election Observer of Congress त्यामूळे मतदारांनी विकासाच्या भूलथापांना बळी न पडता महाविकास आघाडीला मतदान करावे. असे आवाहन काॅग्रेसचे निवडणुक निरीक्षक जाफर शेख यांनी केले. Jafar Shekh
स्थानिक दुर्गा मंदिर सभागृहात पार पडलेल्या मतदान बुथ प्रतिनिधी आणि पदाधिका-यांच्या उदबोधन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी निवृत्त न्यायमर्ती चंद्रलाल मेश्राम, भोई समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते यादवराव मेश्राम, दिनानाथ वाघमारे, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे उपाध्यक्ष यशवंत दिघोरे, सामाजीक कार्यकर्ते बंडु धोतरे आदि उपस्थित होते. प्रारंभी तालुकाध्यक्ष गुरू गुरनूले यांनी कार्यक्रमाच्या आयोजना मागची भूमीका विषद केली. निवृत्त न्यायमूर्ती चंद्रलाल मेश्राम यांनी राजकिय पक्ष भोई समाजाला देण्याचे आश्वासन देवून प्रत्येक निवडणुकीत दिशाभूल करण्यांत येते. दिसतं तसं नसतं, हे निर्विवाद सत्य आहे, तरीसुध्दा डोळयावर पट्टी बांधुन दुर्लक्ष करीत असलेल्या मतदारांना सत्तारूढ पक्षाची कारकिर्दी विषयी जागे करण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीला भक्कमपणे पाठींबा दिल्याचे सांगीतले. Bandu Dhotre
यावेळी उमेदवार संतोषसिंह रावत यांनी बुथ प्रमुख हे प्रचारातील मुख्य शिलेदार असून या शिलेदारांच्या बळावर महाविकास आघाडीचा विजय सुनिश्चित आहे. अश्या भ्रमात न राहता मतदानाचे दिवशी जागृत राहण्याची विनंती केली. सामाजीक कार्यकर्ते तथा प्रशिक्षक बंडु धोतरे यांनी बुथ प्रमुख तथा पदाधिका-यांना मतदान प्रक्रिये सोबतचं महाविकास आघाडीच्या पंचसुत्री विषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे संचलन शहर अध्यक्ष सुनिल शेरकी यांनी तर उपस्थितांचे आभार महिला काॅंग्रेसच्या शहर अध्यक्ष नलीनी आडपवार यांनी मानले. प्रशिक्षण कार्यक्रमाला तालुक्यातील बुथ प्रतिनिधी आणि तिनशेच्यावर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते. Mul,
रिपाई गवई गटाचा महाविकास आघाडीला पाठींबा
संविधानाचे रक्षण करण्यासाठी होवु घातलेल्या विधानसभा निवडणुकीत रिपाई गवई गटाने महाविकास आघाडीचे उमेदवार संतोषसिंह रावत यांना पाठींबा जाहीर केला आहे. जिल्हाध्यक्ष गोपाल रायपुरे, जिल्हा उपाध्यक्ष कोल रामटेके, जिल्हा कार्याध्यक्ष लाजर कांबळे आणि माजी जिल्हाध्यक्ष बाजीराव उंदीरवाडे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पञकातुन रिपाईच्या कार्यकर्त्यांना महाविकास आघाडीचा प्रचार करण्याचे आवाहन केले आहे.