मूल येथील बाईक प्रचार रॅलीत सहभागी
निनाद शेंडे, मूल : सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्य करणाऱ्या युवा क्रांती संघटनेने विधानसभा निवडणुकीत जिल्हाचे पालकमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांना जाहिर पाठींबा देत मूल येथील महायुतीच्या बाईक प्रचार रॅलीत सहभागी झाले. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निखील वाढई यांनी नामदार सुधीर मुनगंटीवार यांचे मूल येथे आगमन होताच त्यांना पुष्पगुच्छ देवुन देवुन स्वागत केले व निवडुन येण्यासाठी शुभेच्छा दिल्या. Yuvakranti Organization
गेल्या अनेक वर्षापासुन मूल तालुक्यात कार्यरत असलेल्या युवा क्रांती संघटनेने अनेक लोकोपयोगी कार्य केलेले आहे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वाटप, रक्तदान शिबीराचे आयोजन, पुरात बुडालेल्या नागरीकांना जिवनाश्यक किटचे वाटप यासारखे अनेक लोकोपयोगी कार्य संघटनेने मार्फत केल्या जात आहे. संघटनेच्या अतुलनिय कार्यामुळे तालुक्यात हजारो युवक संघटनेशी जोडलेले आहे. युवाक्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निखील वाढई आणि विद्यमान अध्यक्ष प्रणित पाल यांच्या नेतृत्वात तालुक्यात अनेक शाखा आहेत. संघटनेने नुकतेच जिल्हयाचे पालकमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांना विधानसभा निवडणुकीमध्ये जाहिर पाठींबा देत मूल येथे आयोजीत केलेल्या बाईक रॅलीत सहभागी होवुन निवडणुक प्रचार करणार असल्याचे जाहिर केले. Namdar sudhir Mungantiwar
यावेळी युवाक्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निखील वाढई, विद्यमान अध्यक्ष प्रणित पाल, निहाल गेडाम, किशोर चौखुंडे, साई आक्केवार, अक्षय दुम्मेवार, सोहिल पठाण, ईश्वर लोनबले, दिनेश खेवले, अमीत चलाख, दिनेश गुरनुले, सुमित दुपारे, ओम लाटकर, प्रमोद मंकीवार, आकाश चौखुंडे, अंकुश बुट्टे, सुधीर वाढगुरे, आशु गणवीर, आदर्श गेडाम, सोनु मेश्राम, अंकित कतकलवार, संदिप भोयर, जय चौखुंडे, विकास चौखुंडे, अरविंद गुज्जनवार, आशिष घ्यार यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होेते. Nikhil Wadhai, Pranit Pal