मतदार संघातील राजोली मारोडा जि. प. गटात संतोषसिंह रावत यांचा झंझावती प्रचार

Ballarpur Assembly
Ballarpur Assembly

मूल (प्रतिनिधी) : बल्लारपूर विधानसभा मतदार संघातील मूल तालुका अंतर्गत मारोडा राजोली जिल्हा परिषद गटातील मारोडा, चितेंगाव, बेलगाटा, चिखली, गांगलवाडी, डोंगरगांव, भादुर्णी, उश्राळा येथे भारतीय राष्ट्रीय काॅंग्रेस पार्टी तथा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संतोषसिंह रावत यांच्या निवडणुक प्रचारार्थ जनसंपर्क अभियान राबविण्यांत आले. जनसंपर्क करण्यांत आलेल्या सर्वच गावांत ग्रामस्थांनी प्रचंड प्रतिसाद दिला. Maroda, Chitengaon, Belghata, Chikhli, Gangalwadi, Dongargaon, Bhadurni, Ushrala

गावांच्या वेशीवर उमेदवार संतोषसिंह रावत यांचे स्वागत करण्यांत येवून मिरवणुक काढली. यावेळी ग्रामस्थांनी उमेदवार संतोषसिंह रावत यांचे समोर शेतक-यांच्या व्यथा, तरूणाईची रोजगारीची समस्या, मतदार संघात करण्यांत आलेल्या विविध बांधकामाशिवाय न झालेला विकास, न झालेली सिंचनाची व्यवस्था या गंभीर विषयावर चर्चा घडवून आणत महायुतीच्या उमेदवारा विषयी प्रचंड रोष व्यक्त करत महाविकास आघाडीला पाठींबा देत असल्याचे जाहीर केले. ग्रामस्थांशी संवाद साधतांना उमेदवार संतोषसिंह रावत यांनी जनतेच्या आशिर्वादने आपण विजयी झालोच तर ग्रामस्थांनी मांडलेल्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यास प्रथम प्राधान्य देईल असे आश्वासन दिले. यावेळी करण्यांत आलेल्या जनसंपर्क अभियाना दरम्यान काॅंग्रेस पक्षाचे ओबीसी आघाडीचे प्रदेश सरचिटणीस गुरूदास चौधरी, बाजार समितीचे संचालक संदीप कारमवार, सुनिल गुज्जनवार, राजोलीचे सरपंच जितेंद्र लोणारे, चिमढा येथील सरपंच कालीदास खोब्रागडे, उपसरंपच अरविंद बोरूले, डोंगरगांव येथील काॅंग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते किरण पोरेड्डीवार, शाम पुट्ठावार, लहुजी कडस्कर, निकुरे आदि उपस्थित होते. Ballarpur Assembly

महिलाही राबवित आहेत प्रचारार्थ जनसंपर्क अभियान
बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे महाविकास आघाडीचे उमेदवार संतोषसिंह रावत यांच्या निवडणुक प्रचारार्थ तालुका महिला काॅंग्रेसच्या पदाधिका-यांनी कंबर कसली आहे. रस्ते, पुल आणि इमारत बांधकामा शिवाय न झालेला विकास डोळयासमोर ठेवून महिला काॅंग्रेसच्या तालुका अध्यक्ष रूपाली संतोषवार, बाजार समितीच्या संचालीका चंदा कामडी, सरपंचा हिमानी वाकुळकर, नलीनी आडपवार, ममता रावत, उषा मुरकुटे, शंकुतला समर्थ, वर्षा पडोळे, माधुरी गुरनूले आदि पदाधिका-यांनी मतदार संघातील नांदगांव, नवेगांव मोरे, पोंभुर्णा, घाटकुळ, घोसरी, जुनगांव, गंगापूर टोक, देवाडा, भिमनी, कवठी, मारोडा, कोसंबी, उश्राळा, भादुर्णी परिसरात जनसंपर्क अभियान राबवित बेरोजगारांना रोजगार आणि सिंचनाची व्यवस्था करून घेण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार संतोषसिंह रावत यांना विजयी करण्याची विनंती केली.