शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गि-हे आणि राकाँपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांचे आवाहन
मूल (प्रतिनिधी) : बेरोजगारांना रोजगार आणि शेतक-यांसाठी सिंचनाची व्यवस्था न करता विकासाची वल्गना करणा-या महायुतीच्या उमेदवाराला जाब विचारण्याची गरज असून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मन आणि मतभेद विसरून एकदिलाने महाविकास आघाडीचे उमेदवार संतोषसिंह रावत यांच्या विजयासाठी परिश्रम घ्यावे. असे आवाहन शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गि-हे आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी केले. Sandeep Girhe, Rajendra Vaidya
मूल येथे पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. होवू घातलेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने संतोषसिंह रावत यांना उमेदवारी दिली असून विरोधी उमेदवारांशी लढत देण्यासाठी ते सक्षम आहेत. नगर परिषद अध्यक्ष पदापासून बाजार समितीचे सभापती पद, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाचा त्यांना अनुभव असुन सध्या ते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या अध्यक्ष पदाची जबाबदारी संतोषसिंह रावत प्रामाणिकपणे सांभाळत आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून जनतेसाठी काय करावे. याचा त्यांना चांगला अनुभव आणि अभ्यास आहे. युवाशक्ती व्यायाम शाळेच्या माध्यमातून त्यांनी तालुक्यातील युवक आणि खेडाळूंना संधी उपलब्ध करून दिली असून बाजार समितीच्या माध्यमातून त्यांनी शेतक-यांच्या अडचणीचाही चांगला अभ्यास आहे. त्यामूळे विरोधी पक्षाच्या उमेदवाराच्या तुलनेत महाविकास आघाडीचे उमेदवार संतोषसिंह रावत सक्षम असल्याने त्यांच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यानी प्रामाणीकपणे प्रयत्न करून त्यांना विजयी करावे. अशी विनंती राकाॅंपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी तर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप गि-हे यांनी शिवसेनेच्या समस्त कार्यकर्त्यानी महाविकास आघाडीच्या निर्मिती संबंधी पक्षश्रेष्ठीनी घेतलेल्या निर्णयाचे पालन करून महाविकास आघाडीचे उमेदवार संतोषसिंह रावत यांच्या विजयासाठी पक्षकार्ये समजून नेटाने कामाला लागावे. असे आवाहन केले. यावेळी रिपाईचे पवन भगत यांनीही संविधानाच्या रक्षणासाठी महाविकास आघाडीच्या विजयाची नितांत गरज असून महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाल्यास संविधानाचे रक्षण झाल्याशिवाय राहणार नाही. असे सांगून राहुलजी गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी रिपाईच्या समस्त कार्यकर्त्यानी संतोषसिंह रावत यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहावे. अशी विनंती केली. Mahavikas Aghadi
महिलांच्या सुरक्षीततेसाठी महाविकास आघाडी वचनबध्द असल्याने महिला भगिनींनी संतोषसिंह रावत यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहण्याचे आवाहन राकाॅपाच्या महिला जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके यांनी आवाहन केले. आदिवासी नेते तथा निवृत्त तलाठी संपत कुमरे यांनी आदिवासी समाजावर अन्याय अत्याचार करणा-या महायुतीचा पराभव करण्यासाठी आदिवासी समाजाने एकसंघ राहावे. अशी विनंती केली. यावेळी राकाॅपाचे मूल तालुकाध्यक्ष प्रा. किसन वासाडे, शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रशांत गट्टूवार, राजगडचे माजी सरपंच तथा ज्येष्ठ सामाजीक कार्यकर्ते चंदूपाटील मारकवार यांनी मनोगत व्यक्त करतांना संतोषसिंह रावत यांचा विजय म्हणजे सर्वसामान्य जनतेचा विजय असणार आहे. त्यामूळे प्रामाणिकपणे प्रचार करणार. अशी ग्वाही दिली. यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार संतोषसिंह रावत यांनी निवडणुकीचा प्रचार करतांना वेळे अभावी आपल्या पर्यंत पोहोचू शकलो नाही तर कृपया गैरसमज न करता प्रचार यंत्रणा थांबवू नये. अशी विनंती केली. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार, माजी सभापती घनश्याम येनुरकर, महिला तालुकाध्यक्ष रूपाली संतोषवार, बाजार समितीचे संचालक किशोर घडसे, चंदा कामडी, रिपाईचे यादव रामटेके, हसन वाढई, दशरथ वाकुडकर, रूमदेव गोहणे, किरण पोरेड्डीवार, सुनिल गुज्जनवार, संदीप कारमवार, रशिद शेख, अनवर शेख, आदि पदाधिकारी उपस्थित होते. सभेचे संचालन सुनिल शेरकी यांनी तर तालुकाध्यक्ष गुरू गुरनूले यांनी आभार मानले.