मुनगंटीवारांच्या हस्ते होणार पक्ष प्रवेश
मूल (प्रतिनिधी): विधानसभेची निवडणुक काही दिवसांवर येवुन ठेपली असतानाच कॉग्रेसचा एक नेता भाजपाच्या वाटेवर आहे, कॉंग्रेस पक्षात राहुन अनेक पदे भुषविले असे असतानाही कॉंग्रेसला सोडचिट्टी देण्याचे कारण अजुन तरी गुलदस्त्यात आहे. परंतु त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे कॉगेस पक्षाचे काही प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. Congress
मूल तालुक्यात कॉंग्रेसचे नेते संतोषसिंह रावत यांच्या नेतृत्वात सहकारी संस्थेवर वर्चस्व आहे, अनेक ग्राम पंचायत त्यांच्या ताब्यात आहेत, असे असतानाही ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा माजी सरपंच असलेला एक कॉग्रेस नेता भाजपात प्रवेश करणार असल्याची खात्रीशीर माहिती आहे. BJP
कॉंग्रेसचे उमेदवार संतोषसिंह रावत यांचे खंदे समर्थक असलेल्या आणि विधानसभेची निवडणुक रावत हेच लढवित असतानाही तो भाजपामध्ये प्रवेश करण्याचे कारण सध्यातरी गुलदस्ता आहे.