समाज भवनाच्या मागणीसाठी गेलो मात्र पक्षप्रवेश करवुन घेतला : रविंद्र चौधरी यांचा आरोप party entry

party entry
party entry

निनाद शेंडे, मूल : राजगड येथे माना समाज भवनाची गरज लक्षात घेवुन जिल्हयाचे पालकमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे गेलो होतो, मात्र त्याठिकाणी माझा पक्ष प्रवेश करवुन घेतल्याचा आरोप रविंद्र चौधरी यांनी पत्रकार परिषदेत केला. party entry

मूल येथे आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, आम्ही सर्व अविरोध निवडुन आलेले आहोत, आमचा कॉंग्रेस पक्षाशी सुध्दा संबध नाही, मात्र चुकीने माझा भारतीय जनता पक्षात प्रवेश घेण्यात आला, मात्र आता आपली चूक लक्षात आल्यांचे राजगडचे सरपंच रविंद्र चौधरी यांनी आज पत्रकार परिषदेत जाहीर केले. समाज भवनाच्या मागणीसाठी दोन दिवसापूर्वी मी गावातील काही नागरीकांसह पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे गेलो होते, त्याठिकाणी माझा नामदार मुनगंटीवार यांच्या हस्ते भाजपात प्रवेश करण्यात आला, यावेळी माझेसोबत ग्राम पंचायतचे कोणतेही सदस्य उपस्थित नव्हते. असेही ते म्हणाले. Ravindra Chaudhari

कॉंग्रेसला खिंडार पाडून राजगडच्या सरपंचाचा भाजपात प्रवेश अशा मथळ्याखालील बातमी देणे चुकीचे असून, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेकडून अशी अपेक्षा नव्हती असे मत उपसरपंच चंदू पाटील मारकवार यांनी व्यक्त केली. आजपर्यंत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राजगडच्या विकासाचे कोणतेही प्रस्ताव मंजूर केले नसल्याची टिका त्यांनी यावेळी केली. अनावधानाने मी भाजपामध्ये प्रवेश घेतला आहे परंतु मी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्यांचे सरपंच चौधरी यांनी यावेळी सांगीतले. पत्रकार परिषदेला ग्राम पंचायत सदस्य सचिन भांदककर, अमर वालदे, रेवता ठाकूर, रोशना कलसार, मनिषा हजारे, शुभांगी अलाम उपस्थित होते.