आरोग्य, सिंचन आणि रोजगारांचा प्रश्न कायम सोडविण्यासाठी प्रयत्न करेन

Press conference
Press conference

संतोष रावत यांचा पत्रकार परिषदेत आश्वासन

मूल (प्रतिनिधी): क्षेत्रात गेल्या 35 वर्षापासुन कॉंग्रेस पक्षाचा आमदार नसतानाही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कॉंग्रेसची सत्ता आहे, सत्तेअभावी कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे कामे करीत असताना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो, पक्षाने माझेवर विश्वास टाकुन विधानसभेची उमेदवारी दिलेली आहे, त्याचविश्वासाने व जनतेच्या आर्शिवादाने मी उमेदवारी अर्ज भरणार असुन निवडुन आल्यास आरोग्य, सिंचन आणि रोजगाराचा प्रश्न कायम सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे संतोषसिंह रावत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. Health, Irrigation Employment

Press conference1
Press conference1

कॉंग्रेसचे उमेदवार संतोष रावत यांच्या प्रचार कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत रावत यांनी केलेल्या कामांचा पाढा वाचुन दाखविले, मूल नगर पालीकेचे नगराध्यक्ष, बाजार समितीचे सभापती, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष पद भुषविलेले असुन कामांचा मोठा अनुभव असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले. कोरोना काळात किटसचे वाटप, मोफत भोजनदार, गॅस सिलेेंडरचा पुरवठा करून अनेकांना जिवनदान देण्याचे कार्यही त्यांनी केले. जनतेचे आरोग्य उत्तम राहावे यासाठी आरोग्य शिबीर व औषधोपचार केलेले आहे. शासनाच्या जाचक अटीमुळे अनेक गरजु नागरीकांचे घरकुलाचे स्वप्न अधुरे आहेत, त्यामुळे रेतीघाटाचा लिलाव करून घरकुलांचे स्वप्न पुर्ण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जुन सांगीतले. पिक विम्यांचा लाभ अनेक शेतकऱ्याना मिळालेला नाही, शासन शेतकऱ्याप्रती भेदभावपुर्व वागणुक देत असल्याचा आरोपही रावत यांनी यावेळी केला. Santosh Rawat

यावेळी माजी नगराध्यक्ष विजय चिमडयालवार यांनी कॉग्रेस पक्षात प्रवेश केल्याने त्यांच्या गळयात कॉंग्रेसचा दुप्पटा टाकुन कॉंग्रेस नेते संतोष रावत यांनी त्यांचे स्वागत केले. Vijay Chimdyalwar

पत्रकार परिषदेला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक संदिप गड्डमवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार, मूल नगर पालीकचे माजी उपाध्यक्ष प्रकाश कागदेलवार, माजी सभापती बाबा अझिम, कॉंग्रेसचे जेष्ठ कार्यकर्त अशोक आक्केवार, धनंजय चिंतावार, सुरेश फुलझेले उपस्थित होते. Press conference