हजारो नागरीकांची उपस्थिती
संगीता गेडाम, मूल : कॉंग्रेसचे जेष्ठ नेते, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोष रावत यांनी आज (29 ऑक्टोंबर) रोजी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातुन कॉंग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केले. हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत व जल्लोषात निघालेल्या रॅलीत कॉंग्रेसचे नेते व विधानसभेचे विरोधी पक्ष नेते नामदार विजय वडेट्टीवार यांनीही प्रशासकीय भवनात येऊन उपस्थिती दर्शविली. Santosh Rawat
नागपूर रोडस्थित असलेल्या रम्यज्योत लॉन येथे झालेल्या सभेचे रूपांतर रॅलीमध्ये झाले. यावेळी कॉंग्रेस, रॉष्ट्रवादी कॉंग्रेस आणि घटकपक्षाचे जेष्ठ नेते मंडळी उपस्थित होते. दुपारी 1 वाजता दरम्यान निघालेली रॅली दुपारी 2.45 वाजता प्रशासकीय भवनासमोर गेली. यावेळी कॉंग्रेसचे उमेदवार संतोषसिंह रावत यांनी आपले नामांकन दाखल केले. Ballarpur Assembly
शेवटच्या दिवशी यांनी केले नामांकन दाखल
नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी प्रकाश मुरलीधर पाटील अपक्ष, रब्बानी याबुक सय्यद अपक्ष, रावत संतोषसिंह चंदनसिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, उमेश राजेश्वर शेंडे पिपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक, मनोज धर्मा आत्राम गोंडवाना गणतंत्र पार्टी, संजय मारोतराव घाटे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि अपक्ष, सत्यपाल राधोजी कातकार अपक्ष, गावतुरे छाया बंडू अपक्ष, गावतुरे अनिता सुधाकर अपक्ष, नरेंद्र शंकर सोनारकर बहुजन समाज पार्टी, सचिन राजबहुरण रावत अपक्ष, अभिलाषा राकेश गावतुरे अपक्ष, राकेश नामदेवराव गावतुरे अपक्ष, भारत सोमाजी थूलकर ऑल इंडिया रिपब्लिकन पार्टी, संजय शंकर कन्नावार राष्ट्रीय समाज पक्ष, सय्यद अफजल अली सय्यद आबिद अली अपक्ष, संदीप अनिल गि.हे अपक्ष, विरेंद्र भीमराव कांबळे अपक्ष यांनी नामांकन दाखल केले आहे.