संगीता गेडाम मूल : 20 नोव्हेंबर रोजी होवु घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असुन यासाठी बल्लारपूर विधानसभा मतदार संघात 28 ऑक्टोंबर रोजी 10 उमेदवारांनी 14 नामांकन दाखल केले आहे. यामध्ये विद्यमान आमदार तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांनीही नामांकनअर्ज दाखल केला आहे. Nomination filed by Sudhir Mungantiwar
72 बल्लारपूर-पोंभुर्णा-मूल विधानसभा मतदार संघात अनेक जण निवडणुक रिंगणात उतरण्यात इच्छुक असुन कॉंग्रेसची उमेदवारी 27 ऑक्टोंबर रोजी रात्रौ जाहिर करण्यात आले आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोष रावत यांना जाहिर करण्यात आली आहे. त्यांनी 25 ऑक्टोंबर रोजी पक्षाचे ए बी फार्म न जोडताच नामाकण दाखल केले आहे. तर 28 ऑक्टोंबर रोजी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचेसह किशोर बंडू उईके अपक्ष, संजय नीलकंठ गावंडे अपक्ष, रामराव ओंकार चव्हाण अपक्ष, निशा शीतलकुमार धोंगडे अपक्ष, राजू देवीदास जांभुळे अपक्ष, सतीश मुरलीधर मालेकर वंचित बहुजन आघाडी, कुणाल पुरुषोत्तम गायकवाड अपक्ष, अरुण देवीदास कांबळे आर पी आय परंतु ए बी जोडले नाही, अभिलाषा राकेश गावतुरे अपक्ष यांनी नामाकण दाखल केले आहे. Ballarpur Assembly
नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी मॉ कन्यका माता मंदीरात सहकुटुंब पुजा केली आणि हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत गुजरी चौकातुन रॅली काढुन उपविभागीय कार्यालयात नामांकण दाखल केले.