वाघाच्या हल्यात बैल ठार tiger attack

tiger attack
tiger attack

आकापूर शेतशिवारातील घटना

निनाद शेंडे, मूल : गेल्या काही दिवसांपासुन आकापूर-मरेगांव परिसरात वाघाची दहशत कायम असुन शनिवारी दुपारी 12 वाजता दरम्यान शेतात चराईसाठी नेलेल्या बैलावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना आकापूर येथील नितीन पेंटेवार यांच्या शेतात घडली. Akapur

मूल तालुक्यातील मरेगांव-आकापूर परिसरात मागील काही दिवसापासुन वाघाची दहशत आहे, काही दिवसांपुर्वी मरेगांव येथील एका गुराख्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना ताजी असताना आज (ता. 25 ऑक्टोंबर) रोजी दुपारी 12 वाजता दरम्यान नितीन पेंटेवार यांच्या स्वतःच्या शेतात बैल चराईसाठी पाठविले असता दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करून जागीच ठार केले. जवळपास 1 लाख 25 हजार रूपये किंमतीचा बैल असुन शासनाने तात्काळ नुकसान भरपाई दयावी अशी मागणी शेतकÚयांनी केली आहे. bull is killed by a tiger

घटनास्थळावर वनविभागाचे अधिकारी कर्मचारी भेट देवुन पंचनामा केला असुन पुढील कारवाई वनपरिक्षेत्राधिकारी विनोद धुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. Mul Chandrapur saoli

वाघाचा बंदोबस्त करा: संदिप कारमवार
मूल तालुक्यात मागील काही दिवसांपासुन वाघाचे हल्ले वाढत आहे. अनेकांचे जिव जात आहे मात्र शासन वाघाचा बंदोबस्त करण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे मानव आणि पाळीव जनावरांवर वाघाचे हल्ले वाढतच चालले आहे, शासनाने तात्काळ वाघाचा बंदोबस्त करावा अन्यथा वनविभागावर आंदोलन करू अशा इशारा विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष संदिप कारमवार यांनी दिला आहे.