भोजराज गोवर्धन मूल : बल्हारपुर विधानसभेत महाविकास आघाडीत अजूनही बिघाडी आहे. राज्यातील इतर जागांवरचे उमेदवार शिवसेनेने आणि कॉंग्रेसने जाहीर केले, मात्र बल्हारपूर बाबत दोनही पक्ष सस्पेंस कायम ठेवून आहे. Sangli pattern
कॉंग्रेसची उमेदवारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष आणि कॉंग्रेसचे जेष्ठ नेते संतोष रावत यांना देण्याचा निर्णय पक्ष वरिष्ठानी घेतला आहे, या सुचनेनुसारच रावत यांनी निवडणूकीची तयारी सुरू केली आहे. रावतची तयारी सुरू असतांनाच, माघार घेतलेल्या शिवसेनेने अचानक घुमजाव करीत, बल्हारपूर मधून जिल्हा शिवसेना प्रमुख संदीप गिर्हे यांना तातडीने मातोश्रीवर मुंबईला बोलाविणे आले. त्यांना शिवसेनेचा एबी फार्म दिला म्हणून शिवसैनिकांनी फटाके फोडून आनंदही व्यक्त केला. शिवसेनेच्या अधिकृत यादीत संदीप गिर्हे यांचे नांव नसले तरी, पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी गिर्हे यांना उमेदवारी अर्ज दाखल करायला सांगीतले आहे. या सुचनेनुसारच गिर्हे यांनी पुन्हा तयारी सुरू केली आहे. 29 आॅक्टोबरला भव्य रॅलीने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असल्यांचे अनेक शिवसैनिकांनी पोष्ट करून सांगीतले आहे. इकडे रावत यांनीही कॉंग्रेसकडून उमेदवारी दाखल करून शक्तीप्रदर्शनाची तयारी सुरू केली आहे. Ballarpur Legislative Assembly
आता माघार नाही, सायंकाळ पर्यंत संदीप गिर्हे यांचे नांव जाहीर होईल असा विश्वास व्यक्त शिवसैनिक व्यक्त करीत आहे. तसे झाले तर, लोकसभेत सांगली पॅटर्न बल्हारपूरात दिसेल.
काय आहे, सांगली पॅटर्न?
लोकसभा निवडणूकीत शिवसेनेने परस्पर चंद्रहार यांना शिवसेनेची उमेदवारी जाहीर करून टाकली. या जागेवर कॉंग्रसला विशाल पाटील यांना उमेदवारी द्यायची होती. अखेरपर्यंत दोनही पक्षात तडजोड होवू न शकल्यांने, लोकसभेत येथे मैत्रीपूर्ण लढत होवून कॉंग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील भक्कम मतानी विजयी झाले होते.