चार ते सहा व्यक्तींनी मिळून वार केल्याची माहिती आहे.
मूल (प्रतिनिधी): सायकाळी फिरायला गेलेल्या मूल येथील बौध्द समाज मंडळाचे अध्यक्ष शम्मीकांत डोर्लीकर यांच्यावर आज चार ते सहा व्यक्तींनी मिळुन धारदार शस्त्राने वार केल्याने मूल शहरात खळबळ उडाली आहे. वार करणारे हे एका राजकीय पक्षाचे स्थानिक पदाधिकारी असल्याचे बोलले जात आहे. Shammi Dorlikar
शम्मीकांत डोर्लीकर यांच्यावर मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात प्राथमिक उपचार करून चंद्रपूरला हलविण्यात आल्याची माहिती आहे. अंधाराचा फायदा घेत हा हल्ला करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. हल्ल्यामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. मारहाण करणारे राजकीय पक्षाचे पदाधिकारी असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. Mul