मूल पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल
मूल (प्रतिनिधी): येथील एका पत्रकाराने खोटे आणि निराधार आरोप करून माझी सामाजिक बदनामी केलेली आहे, याबाबत त्यांच्याशी बोलण्यासाठी गेलो असता त्यांनी मला 10 लाखाची खंडणी मागीतल्याचा आरोप मूल येथील व्यापारी जिवन कोंतमवार यांनी केला असुन त्यासंबधीचे तक्रार मूल पोलीस स्टेशनला केली आहे. तक्रारीवरून मूल पोलीसांनी पत्रकार अशरफभाई मिस्त्री यांच्यावर विविध कलमांवये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान मूल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सदर घटनेची माहिती सांगितली. Jiwan Kontamwar
मूल येथील राईस मिल असोशिएशनच्या सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत जिवन कोंतमवार यांनी सांगितले की, मूल येथील पत्रकार अशरफभाई मिस्त्री यांनी 29 सप्टेंबर रोजी सन 2010 मध्ये घडलेल्या एका घटनेचे पेपर मधील बातम्या व माझे मालमत्ते संबधाचे दस्ताऐवज शेअर केले, त्यावेळी मी उपचारासाठी बाहेर असल्याने 5 व 6 ऑक्टोंबर रोजी त्यांना व्हॉटस्अॅप कॉल केला परंतु त्यांनी तो स्विकारला नाही, दरम्यान 7 ऑक्टोंबर रोजी त्यांनी त्यांचे ब्लॉगवर बातमी प्रसिध्द केलेे व माझी बदनामी करणारा संदेश पाठविला, व इतरही ग्रुपवर त्यांनी तो संदेश पाठविला. त्यामुळे 11 ऑक्टोंबर रोजी 10.20 वाजता अशरफभाई मिस्त्री यांचे घरी जावुन विचारणा केली असता, सुधीरभाउ मुनगंटीवार व त्यांचे सहा. राजेश सुरावार यांचे माध्यमातुन 33 करोड रूपयाची खोटी बिले सादर करून शासनाकडुन वसुल केले आहे. त्यापैकी 10 टक्के रक्कम देण्याची मागणी केली, त्यानंतर कमीतकमी 10 लाख रूपये खंडणी दयावी असा आग्रह केल्याचे जिवन कोंमतवार यांनी यावेळी सांगितले. Mul
मी कोणत्याही गैरमार्गातुन पैसे कमविलेले नाही, माझे व्यवसायातुन व मेहनतीने कमविले आहे. त्यामुळे खंडणी देण्यास नकार दिल्याचे ते सांगितले. कुख्यात गुंड दाउद, रोमेश शर्मा व इतरांकडुन जिवीतास धोका टाळायची असेल तर खंडणीची रक्कम दे किंवा गंभीर परिणाम भोगावे लागती असे म्हटल्याचेही त्यांनी यावेळी सांगीतले. खंडणी व धमकीमुळे माझे कुटुंबिय भयभित झाल्याचे कोंतमवार यांनी सांगत त्या पत्रकाराविरोधात मानहानीचा दावा दाखल करून तडीपार करण्याची मागणी प्रशासनाकडे करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले. Ashrafali Mistry
रिवाल्वर सोबत बाळगण्याची मागीतलीे परवानगी
जिवन कोंतमवार यांचेकडे असलेली पिस्तोल क्रं. एम. के. 1 एस. ए. एफ. 2015 नं. डी. 3969 ही आचार संहिता असल्याने पोलीस स्टेशन येथे जमा केलेली आहे, मात्र जिवे मारण्याची धमकी आल्याने रिवाल्वर कामयस्वरूपी सोबत बाळगण्याची परवानगी दयावी अशी विनंती अर्ज जिवन कोंतमवार यांनी मूल पोलीस स्टेशन येथे केलेली आहे. त्यासोबतच पोलीस सुरक्षा पुरविण्याची मागणीही त्यांनी केलेली आहे.
खंडणी मागण्याचा प्रश्नच येत नाही: अशरफभाई मिस्त्री
जिवन कोंतमवार यांची ग्रिन बेल्ट शेती येलो बेल्ट करण्याचे प्रकरण आणि अवैधरित्या विजेचे तार हटविण्याचे प्रकरण मी 7 ऑक्टोंबर रोजी पोर्टलवर प्रसिध्द करून चौकशीची मागणी केली होती. 2 सप्टेंबर रोजी विरेंद्र जयस्वाल यांनी 17 मे 2023 रोजी कशीष दैनिकात प्रकाशीत केलेली बातमी सर्व व्हाटसअप ग्रुपवर वायरल केली होती, कोणताही खंडणी मागणारा पत्रकार बातमी प्रकाशीत करण्यापुर्वी सौदेबाजी करतो, सौदेबाजी न झाल्यास बातमी प्रकाशीत करतो, मात्र मी बातमी प्रकाशीत केलेली आहे. यामुळे खंडणी मागण्याचा प्रश्नच येत नाही. ज्या दाउद व लोमेश शर्माना मी पकडुन दिलो. आणि माझेमुळे त्यांची करोडोची मालमत्ता जप्त करण्यात आली त्या व्यक्तींच्या नांवाने मी धमकी कशी देणार आहे. हा सर्व खेळ पोलीस यंत्रणा आणि काही दोन नंबरी लोक खेळुन खोटी रिपोर्ट दिली आहे. पोलीस प्रशासनाने जी प्रेस नोट काढली त्यावर साधी सही नाही शिक्का नाही, त्यामुळे ही प्रेसनोट सत्य कशी काय समजायचे असा सवालही अशरफभाई मिस्त्री यांनी उपस्थित केला आहे.