नहरात वाहून गेलेला ग्रामपंचायत सदस्य अजुनही बेपत्ताच missing

Dilip Satpute
Dilip Satpute

देवी विसर्जनासाठी गेल्याने झाला घात

मूल (प्रतिनिधी): देवीच्या विसर्जनासाठी गोसेखुर्दच्या नहरावर गेलेल्या चकदुगाळा येथील ग्राम पंचायत सदस्य नहरामध्ये वाहुन गेला, प्रशासनाने शोधकार्य सुरू केलेला आहे मात्र अजुनही त्याचा थांगपत्ता लागलेला नाही, दिलीप सातपुते वय 42 वर्षे रा. दुगाळा माल असे नहरात वाहुन गेलेल्या इसमाचे नांव आहे. Dilip Satpute

मूल तालुक्यातील मौजा चकदुगाळा येथील ग्राम पंचायत सदस्य व दुगाळा माल येथील प्रगतशील शेतकरी दिलीप सातपुते वय (42) हे गोसीखुर्दच्या नहरामध्ये दुर्गा देवी विसर्जन करण्यासाठी रविवारी (ता. 13 ला) रोजी गेले होते, दरम्यान गोसेखुर्द नहराचा प्रवाहात वाढ झाल्याने व पाण्याचा अंदाज न आल्याने ते वाहुन गेले. घटनेची माहिती तालुका प्रशासन, गोसीखुर्द विभाग आणि पोलीस प्रशासनाला दिली, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने पथकासह व स्थानिक नागरीकांना सोबत घेवुन शोधकार्य करीत आहे. missing

नहरातील पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने सदर व्यक्ती दुरवर वाहुन गेल्याची शंका व्यक्त केल्या जात आहे. रात्रौ उशीरापर्यंत दिलीपचा शोध लागलेला नाही गोसीखुर्द प्रकल्पाच्या अधिकाऱ्याना भ्रमणध्वनीव्दारे नहराचे पाणी काही काळासाठी बंद करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने रात्रौ उशीरापर्यंत शोधकार्य सुरूच ठेवलेले आहे मात्र अजुनतरी दिलीपचा पत्ता लागलेला नाही. घरचा कर्ता व्यक्ती पाण्यात वाहुन गेल्याने कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. दिलीप यांच्या पश्चात पत्नी, व दोन मुली असा आहे. Canals of Gosikhurd

दिलीप हा चकदुगाळा ग्राम पंचायचा सदस्य
दिलीप सातपुते हा मूल तालुक्यातील संवेदशील असलेल्या चकदुगाळा ग्राम पंचायतचा सदस्य आहे. दुपारी 11 वाजता दरम्यान दुर्गा देवीच्या विसर्जनासाठी तो गोसेखुर्द नहरातील पाण्यामध्ये उतरला होता, विसर्जनादरम्यान पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज त्याला न आल्याने तो वाहुन गेला, दिवसभर प्रशासनाने शोधकार्य सुरूच ठेवले मात्र त्याचा पत्ता लागलेला नाही. जातीपातीचे राजकारण करणाऱ्या   राजकीय पक्षाच्या नेत्यांना त्यांच्या कुटुंबियाची साधी भेट घेऊन सात्वन करण्यासाठी वेळ नसावी यापेक्षा दुर्देव काय असु शकते. अशा राजकीय नेत्याप्रती चकदुगाळा परिसरात तिव्र रोष व्यक्त केल्या जात आहे.