ट्रॅक्टरच्या धडकेत सायकलस्वार ठार accident

Bandu Narayan Mutthawar
Bandu Narayan Mutthawar

मूलच्या उमानदी पुलावरील घटना

निनाद शेंडे मूल : आकापूर-मरेगांव स्थित असलेल्या एका कंपनीमध्ये रात्रौ पाळीत काम करून मूल येथे जात असताना एका अज्ञात ट्रक्टरने मागुन धडक दिल्याने त्याला गंभीर दुखापत झाली, त्याला चंद्रपूर येथे उपचारार्थ नेले असता वैद्यकीय अधिकाÚयांनी मृत घोषीत केले. बंडु नारायण मुट्ठावार वय 56 वर्षे असे अपघातात ठार झालेल्या मजुराचे नाव आहे. Akapur-Maregaon MIDC

मूल तालुक्यातील औद्योगिक विकास महामंडळाच्या परिसरात असलेल्या ग्रेटा पॉवर कंपनीमध्ये बंडु नारायण मुट्ठावार वय 56 वर्षे रा. आकापूर हे काम करीत होते. बुधवारी रात्रपाळीमध्ये काम करून सकाळी 7.30 वाजता दरम्यान ते मूल येथे मुलाकडे सायकलनी जात होते, दरम्यान मूलकडे जाणाऱ्या  एका अज्ञात ट्रॅक्टरने त्याला जबर धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. आकापूरचे माजी सरपंच संदिप कारमवार यांनी त्याला मूल येथे उपचारार्थ दाखल केले, मूल येथे प्राथमिक उपचार करून त्याला चंद्रपूर पाठविण्यात आले. चंद्रपूर येथील सामान्य रूग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्याला मृत घोषीत केले. Medical officials declared him dead चंद्रपूर येथील सामान्य रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. Bandu Narayan Mutthawar

सदर प्रकरणाची माहिती मूल पोलीस स्टेशनला देण्यात आली. मूलचे उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी भगत, मूल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. accident#Mul