स्वच्छता मोहीमेसाठी नामदार मुनगंटीवारांकडुन सायकल भेट Cleanliness campaign

Cleanliness campaign
Cleanliness campaign

गौरव शामकुळे यांच्या अविरत स्वच्छता कार्याची दखल

मूल (प्रतिनिधी) : गेल्या 7 वर्षापासुन स्वच्छतेसाठी रोज 2 तास देणाऱ्या  स्वच्छता मित्रा गौरव शामकुळे यांच्या कार्याची दखल घेवुन सदर कार्य वेगाने करावे यासाठी जिल्हयाचे पालकमंत्री तथा राज्याचे वने, सांस्कृतीक कार्य व मत्स्य व्यवसायमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी 5 सायकल आणि जनजागृती करण्याच्या दृष्टीने ध्वनी प्रणाली भेट दिली. सदर सायकल आणि ध्वनी प्रणाली भेट दिल्याबद्दल स्वच्छता मित्र गौरव शामकुळे यांनी नामदार सुधीर मुनगंटीवार यांचे आभार मानले. Sudhir Mungantiwar

Cleanliness campaign1

मूल येथील शोध विचार वेध बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष गौरव शामकुळे यांनी मागील 7 वर्षापासुन स्वच्छता मित्रा टिमच्या माध्यमातुन स्वच्छते महान कार्य त्यांच्या हातुन घडत आहे. रोज दोन तास मित्रांना सोबत घेवुन स्वच्छता करीत असते. समाजसेवक, पदविभुषण बाबा आमटे यांच्या कर्मभुमी असलेल्या सोमनाथ येथे जन्मास आलेल्या गौरवने समाजाची सेवा करण्याच्या दृष्टीने स्वच्छतेचे हे पाऊल उचलले. गेल्या सात वर्षापासुन त्यांनी सोमनाथ येथील धबधब्बा नियमीत वाहत राहावा यासाठी त्यांनी स्वच्छता मोहीम हाती घेतली. यासोबतच सोमनाथ देवस्थान परिसराचीही स्वच्छता निरंकार करीत आहे, सकाळी सुरू होणारी दिनचर्या 2 तास स्वच्छता केल्याशिवाय पुर्ण करीत नाही, कधी स्मशानभुमीत तर कधी कर्मविर महाविद्यालयाच्या पटांगणावर ते स्वच्छता करत असताना दिसतात. त्याच्या साथीला बबलु गेडाम, स्वप्नील आक्केवार, प्रणय दागमवार, प्रतिक मुरकुटे यांची साथ मिळत आहे. Bablu Gedam, Swapnil Akkewar, Pranay Dagamwar, Pratik Murkute त्यांचे हे कार्य अधिक झपाटयाने वाढावे यासाठी त्यांने मूल नगर पालीकेचे माजी गटनेते मोतीलाल टहलियानी यांना 5 सायकलची मागणी केली, Motilal Tahliyani दरम्यान टहलियांनी यांनी जिल्हयाचे पालकमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांचेकडे स्वच्छतेसाठी सायकल, कचरापेटी, ध्वनी प्रणाली आणि स्वच्छतेसाठी लागणारे साहित्य गौरवला स्वच्छता जनजागृती करण्यासाठी देण्याची मागणी केली. Padma Vibhushan Baba Amte

नामदार मुनगंटीवार यांनी महात्मा गांधी जयंतीच्या शुभमुहुर्तावर स्वच्छतेचा संदेश देत जाणजागृती करण्यासाठी 5 सायकल, 5 कचरापेटी, 2 ध्वनी प्रणाली आणि स्वच्छतेसाठी लागणारे साहित्य गौरवच्या साधीन करून 29 सप्टेंबर रोजी रितसर शुभारंभ केला. नामदार मुनगंटीवार यांच्याकडुन मिळालेल्या साहित्यामुळे स्वच्छतेचे काम अधिक वेगाने करण्याची उर्जा मिळाल्याची प्रतिक्रिया गौरव शामकुळे यांनी दिली. Swachhta Mitra Gaurav Shamkule