सेंट अॅन्स पब्लिक स्कुलचा पुढाकार
मूल (प्रतिनिधी): स्वच्छता अभियानाबाबत जनजागृती करण्याच्या दृष्टीने स्थानिक सेंट अॅन्स पब्लिक स्कुलच्या वतिने नुकताच जनजागृती रॅली काढुन विविध उपक्रम राबविण्यात आलेे. यावेळी इयत्ता 9 वी आणि 10 वीच्या विद्यार्थ्यांनी रॅलीत सहभागी झाले होते. St. Ann’s Public School Mul
येथील सेंट अॅन्स पब्लिक स्कुलच्या पटांगणातुन निघालेल्या रॅलीत स्वच्छतेविषयी नारे देत, गांधी चौक आणि बस स्थानकासमोर नुक्कड नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी नागरीकांनी नाटकांला उत्तम प्रतिसाद दिला. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वच्छ ही सेवा हेै, गंदगी जानलेवा है, गांधीजींनी दिला संदेश, स्वच्छ ठेवा भारत देश, देश तभी साफ होगा, जब स्वच्छता मे सबका हाथ होंगा यासारखे विविध नारे देत मूल शहर चांगलेच दुमदुमला. Awareness slogans
सदर रॅली सेंट अॅन्स पब्लिक स्कुलच्या व्यवस्थापक सिस्टर लिली शेबेस्तीएन, प्राचार्य सिस्टर आशा सेबेस्तियन यांच्या मार्गदर्शनखाली काढण्यात आली. रॅलीमध्ये सिस्टर सिसिली, सिस्टर सीजी, चैताली वाळके, सारिका चिलके, स्वरूपा नरेड्डीवार, भुपेश भडके, स्नेहल, आकाश व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले होते.