वनविभागाने केले टी-83 मादी वाघाला जेरबंद Tiger

Tiger
Tiger

जानाळा नियतक्षेत्रातील घटना

संगीता गेडाम मूल : गेल्या अनेक दिवसांपासुन गावकऱ्यांच्या मनात भितीचे वातावरण तयार केलेल्या टी-83 या मादी वाघाला जेरबंद करण्यास वनविभागाला यश आल्याने नागरीकांनीही सुटकेचा निश्वास सोडला. 28 सप्टेंबर रोजी पहाटे 5.20 वाजता दरम्यान सदर मादी वाघाला वनविभागाने जेरबंद केलेले आहे.  Forest Department Chandrapur Mul

मूल तालुक्यातील चिचपल्ली वनपरिक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या जानाळा, कांतापेठ, चिरोली, कवडपेठ, चिचाळा, ताडाळा परिसरात मागीने अनेक दिवसांपासुन मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना वांरवार घडत आहेत. यामुळे वनविभागांकडे राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सदर वाघाला जेरबंद करण्याची मागणी रेटुन धरली होती. यामुळे चंद्रपूर वनवृत चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर यांच्या सुचनेवरून व बफर क्षेत्राचे उपसंचालक आनंद रेड्डी, विभागीय वनाधिकारी प्रशांत खाडे, तेंदुचे सहा. वनसंरक्षक व्ही. एस. तरसे यांचे मार्गदर्शनााखाली चिचपल्लीच्या वनपरिक्षेत्राधिकारी प्रियंका आर. वेलमे, मूल बफरचे वनपरिक्षेत्राधिकारी राहुल कारेकर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे, बायोलॉजीष्ट ब्रम्हपुरीचे राकेश आहुजा, यांचे नेतृत्वात शार्प शुटर अजय मराठे यांनी जानाळा नियतक्षेत्रातील कक्ष क्रं. 717 मध्ये टी-83 मादी वाघाला यशस्वीरित्या बेशुध्द करुन जेरबंद केले. Tiger

सदर मोहीमेत महादवाडीचे क्षेत्र सहा. पी. डी. खनके, केळझरचे क्षेत्र सहा. एन. डब्ल्यु, पडवे, मूलचे क्षेत्र सहा. एम. जे. मस्के, जानाळाचे वनरक्षक. राकेश गुरनुले, मूलचे वनरक्षक एस. आर. ठाकुर, चिचाळाच्या वनरक्षक शीतल व्याहाडकर, दहेगांवच्या वनरक्षक शुभांगी गुरनुले, चिरोलीच्या वनरक्षक. सविता गेडाम, महादवाडीचे वनरक्षक पवन येसांबरे, पिंपळखुटचे वनरक्षक जि. जे. दिवठे, गिरबिलीचे वनरक्षक एस. एस. बावणे, चंद्रपूर येथील आर आर टी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे विकास ताजणे, योगेश लाकडे, प्रफुल वाडगुरे, गुणांक ढोरे, दिपेश टेभुर्णे, वसीम शेख, अमोर कोरपे, अक्षय दांडेकर यांनी सहकार्य केले.

वन्यजिव आणि मानवामध्ये होत असलेल्या संघर्षामुळे अनेक निष्पाप व्यक्तींचे जिव जात असतानाच ताडोबा अधिकारी व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे व त्यांचे पथकाने आत्तापर्यंत मानव वन्यजीव संघर्ष प्रकरणातील 71 वाघ यशस्वीरित्या जेरबंद केलेले आहे हे विशेष. Conflict between wildlife and humans