कोसंबी ग्राम पंचायतचा पुढाकार
निनाद शेंडे मूल : शासनाच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मूल तालुक्यातील कोसंबी ग्राम पंचायतच्या वतिने स्वच्छता ही सेवा 2024 हे 20 दिवशीय स्वच्छता अभियान राबविण्यात आले, यामध्ये सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करण्यात आले असुन सदर शौचालयाचे उद्घाटन मूल पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी बी. एच. राठोड यांच्या हस्ते नुकताच पार पडले. Kosambi gram Panchayat
यावेळी कोसंबी ग्राम पंचायतचे सरपंच रविंद्र किसन कामडी, उपसरपंच सारिका गेडाम, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक तथा ग्राम पंचायत सदस्य चंद्राताई कामडी, तालुका समन्वयक हर्षवर्धन गजभिये, सांडपाणी व्यवस्थापन सल्लागार प्रतिक्षा खोब्रागडे, समुह समन्वयक सचिन येरमलवार, ग्रामपंचायत अधिकारी विपिन वाकडे, ग्राम पंचायत सदस्य मनिष चौधरी, अरुणा वाढई, सुवर्णा कावळे, रोशनी मोहुर्ले, पोलिस पाटील अर्चना मोहुर्ले आदी मान्यवर उपस्थित होेते. BDO Mul
कोसंबी ग्राम पंचायतच्या वतिने 17 सप्टेबर ते 2 ऑक्टोंबर 2024 या कालावधीत स्वच्छता ही सेवा, स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता हा कार्यक्रम राबविण्यात आला, सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने कोसंबीचे सरपंच रविंद्र कामडी यानी कोसंबी येथील नागरीकांना स्वच्छतेचे महत्व पटवुन दिले, उपस्थित मान्यवरांनीही गावकऱ्यांना मार्गदर्शन करताना गाव स्वच्छ, निरोगी आणि सुंदर ठेवले पाहिजे आणि सार्वजनिक शौचालय आपला आहे समजुन व नैतिक जबाबदारी स्वीकारून स्वच्छता ठेवण्याचे आवाहन यावेळी केले. Sarpanch Ravindra Kamdi
कार्यक्रमाचे संचालन प्रशांत गटलेवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार रामकृष्ण गिरडकर यांनी मानले, यावेळी गावकरी नागरीक, शाळकरी मुले मोठया संख्येने उपस्थित होते.