स्मशानभुमीच्या जागेसाठी ख्रिस्ती समाजाचा 7 ऑक्टोंबर रोजी आक्रोष मोर्चा Protest march

Press conference
Press conference

पत्रकार परिषदेत ख्रिस्ती बांधवांची माहिती

मूल (प्रतिनिधी):-गेल्या 40 वर्षापासुन ख्रिस्ती समाजासाठी स्वतंत्र स्मशानभुमीची जागा मिळावी यासाठी प्रयत्न करूनही, प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने नाईलास्तव येत्या 7 ऑक्टोंबर रोजी समाजबांधवांच्या वतिने मूल तहसील कार्यालयावर आक्रोष मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सेंट स्टिफन चर्चचे सचिव डॉ. मार्टिन अझिम यांनी पत्रकार परिषदेत सांगीतले. St. Stephen’s Church

मूल येथील सेंट स्टिफन चर्च मध्ये आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. मार्टिंन अझिम, अॅड. अश्वीन पॉलीकर यांनी सांगीतले की, मूल तालुक्यात मोठया प्रमाणावर ख्रिस्ती बांधव वास्तव्य करीत आहेत, समाजातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यु झाल्यास त्यांना चंद्रपूर येथील स्मशानभुमीत नेऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार करावा लागत आहे, यामुळेे मूल येथेच स्मशानभुमीसाठी जागा मिळावी यासाठी समाज बांधव सन 1986 पासुन शासनाकडे पाठपुरावा करीत आहे मात्र शासन, प्रशासन आमचे मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे यामुळे आंदोलन केल्याशिवाय शासनाला जाग येणार नाही यामुळे स्मशानभुमीच्या जागेसाठी आक्रोष मोर्चाचे काढण्यात येणार असल्याची दिली. Press conference

1986 मध्ये उपविभागीय अधिकारी  मूल यांनी मूल येथील गट क्रं 443 मधील आराजी 1.38 हेक्टर जमीन ख्रिस्ती समाजाच्या स्मशानभुमीसाठी मंजुर करण्यात आली होती, त्याजागेवर संरक्षणभिंत उभारून देण्याची मागणी समाजबांधवानी 1989 मध्ये नगर पालीकेला केली होती, मात्र नगर पालीकेने संरक्षणभिंत उभारून न दिल्याने त्याठिकाणी काही नागरीकांचे अतिक्रमण असल्याने समाजबांधवानी प्रशासनाला अतिक्रमण काढुन देण्याची मागणी केली मात्र प्रशासन काढुन दिले नाही, त्यानंतर 1991 मध्ये सर्व्हे नं. 282 या जागेची मागणी उपविभागीय अधिकारी यांचेकडे समाजबांधवानी केली मात्र त्याकडेही प्रशासन नेहमीसारखे दुर्लक्ष केलेले आहे. 8 सप्टेंबर 24 रोजी मूल तालुक्यातील आदर्शखेडा येथील आनंदाबाई जानबा अल्लीवार या महिलेचे निधन झाल्याने त्यांच्यावर अंत्यसंस्कार कुठे करायचा असा प्रश्न समाजबांधवांपुढे निर्माण झाल्याने यासाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयात प्रेत नेऊन ठेवण्यात आले व प्रेतक्रिया कुठे करायची असे प्रश्न प्रशासनास केल्याने प्रशासनही खळबळुन जागे झाले आणि उपविभागीय अधिकारी मूल, नायब तहसीलदार, पालकमंत्र्यांचे स्विय सचिव, संेट स्टीफन चर्चेचे पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेवुन ख्रिस्तीसमाजासाठी प्रस्ताव तयार करण्यात आला परंतु अजुनही स्मशानभुमीच्या जागेचा प्रश्न कायम आहे.A burial place for a Christian community

ख्रिस्ती समाजबांधवासाठी स्मशाभुमीची जागा देण्याबाबत प्रशासनाने 5 ऑक्टोंबर पर्यंत कार्यवाही न केल्यास  येत्या 7 ऑक्टोबर रोजी प्रशासनाच्या विरूध्द उपविभागीय अधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती सेंट स्टिफन चर्चचे सचिव डॉ. मार्टिन अझिम, अॅड. अश्वीन पॉलीकर, फादर ऑन्टोनी परीच्छा यांनी सांगीतले. पत्रकार परिषदेला अनिल मोजेस, प्रविण तिरणकर, नंदकिशोर कावळे, हरीदास मेश्राम, अशोक टिंगुसले, वसंत खोब्रागडे, सुरेश शेंडे, कोमलदास मानिकपुरी, दिलीप वराते, राकेश शेंडे, तुषार मेश्राम, अमेश सिंदेकर उपस्थित होते. Martin Azim, Adv. Ashwin Polykar