केळझरच्या सरपंच पुनम रामटेके यांचे सरपंच/सदस्य पद रद्द post of Sarpanch/Member is cancelled

Gram Panchayat Kelzar
Gram Panchayat Kelzar

अपर जिल्हाधिकऱ्यांचे आदेश

संगिता गेडाम, मूल
मूल तालुक्यातील राजकीयदृष्टया संवेदनशिल असलेल्या केळझर येथील सरपंच पुनम भिमराव रामटेके punam Ramteke यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 14 (1) (ह), (ग) चे उल्लंधन केल्याचे स्पष्ट झाल्याने केळझर ग्राम पंचायच्या सरपंच/सदस्यपद रद्द करण्यात आल्याचा आदेश 19 सप्टेंबर रोजी अप्पर जिल्हाधिकारी श्रीकांत देशमुख यांनी दिलेला आहे. post of Sarpanch/Member is cancelled

चंद्रपूर जिल्हयातील मूल तालुक्यातील केळझर येथील ग्राम पंचायतची सार्वत्रिक निवडणुक 15 जानेवारी 2021 रोजी पार पडली. सदर निवडणुकीत अनुसुचित जाती राखीव प्रवर्गातुन काजु मिलींद खोब्रागडे या निर्वाचीत झाल्या होत्या. 6 फेंब्रुवारी 21 रोजी पार पडलेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीत काजु खोब्रागडे या बहुमताने निवडुन आल्या, ग्राम पंचायतचे कारभार सुरळीत सुरू असताना फेब्रुवारी 2023 रोजी सरपंच काजु खोब्रागडे यांच्यावर अविश्वास प्रस्ताव पारित झाला, त्यानंतर 6 मे 2023 रोजी पुनम भिमराव रामटेके यांना 2/7 बहुमतांनी सरपंच म्हणन निवडुन दिले. दरम्यानच्या काळात सरपंच पुनम रामटेके यांच्यावर विविध आरोप करून केळझरच्या माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य काजु मिलींद खोब्रागडे यांनी मान. अप्पर जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात प्रकरण दाखल केले. सदर प्रकरणाचा आदेश 19 सप्टेंबर 2024 रोजी अप्पर जिल्हाधिकाÚयांनी दिला असुन सरपंच पुनम भिमराव रामटेके यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 14 (1) (ह), (ग) चे उल्लंधन केल्याचे स्पष्ट झाल्याने केळझर ग्राम पंचायच्या सरपंच/सदस्यपद रद्द करण्यात आले आहे. Kelzar#Kaju Khobragde#Upper Collector

सदर आदेशामुळे केळझर ग्राम पंचायत मध्ये खळबळ माजली असुन पुढील सरपंच कोण? यावर चर्चा रंगु लागल्या आहेत.