विविध विषयांवर केली चर्चा
निनाद शेंडे, मूल
मूल येथे नव्यानेच रूजु झालेले उपविभागीय अधिकारी अजय चरडे यांची युवा क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेवुन शुभेच्छा दिल्या. व मूल तालुक्यातील विविध समस्यांवर चर्चा करून तोडगा करण्याची आश्वासन दिले. Yuva Kranti Sanghtna
गेली अनेक वर्षे उपविभागीय अधिकारी म्हणुन कार्यरत असलेले विशालकुमार मेश्राम यांची प्रशासकीय बदली नागपूर येथे झाल्याने त्याठिकाणी बल्लारपूरचे उपविभागीय अधिकारी अजय चरडे यांच्याकडे मूल उपविभागीय अधिकारी पदावर बदली करण्यात आली. अजय चरडे उपविभागीय अधिकारी म्हणुन मूल येथे रूजु झाल्याने युवा क्रांती संघटनेच्या वतिने त्यांची सदिच्छा भेट घेऊन स्वागत केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिले.SDO Mul Ajay Charde यावेळी मुलच्या तहसीलदार मृदुला मोरे उपस्थित होत्या.
यावेळी मूल तालुक्यातील विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली, यावर भविष्यात कार्यक्षेत्रातील समस्या सोडविण्यावर आपण भर देणार असल्याचे त्यांची सांगीतले. यावेळी युवा क्रांती संघटनेचे अध्यक्ष प्रणित पाल, संस्थापक अध्यक्ष निखील वाढई, निहाल गेडाम, किशोर चौखुंडे, ईश्वर लोनबले, कमलसिंग पटवा, आदर्श गेडाम, धनराज चिमुलवार, अक्षय धुमावार, राज चौखंुडे, सुमित दुपारे उपस्थित होते.