मूल पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल
मूल (प्रतिनिधी): खुल्या जागेवर घराचे बांधकाम केल्याच्या कारणावरून मागील अनेक दिवसांपासुन सुरू असलेल्या वादांचे रूपांतर फ्रि स्टाईल मध्ये झाल्याची घटना 21 सप्टेंबर रोजी मूल येथील ताडाळा मार्गावर घडली. सत्यजित दामाजी वाळके आणि मार्कंडी चावरे यांच्या कुटुंबियांमध्ये ही घटना घडली.molestation
अखेर विरव्हाचे कोतवाल नंदकिशोर खोब्रागडेंचा मृत्तदेहच सापडला dead body was found
पोलीस प्रशासनात अनेक वर्षे सेवा देवुन निवृत्त झालेले सत्यजित दामाजी वाळके वय 65 वर्षे व पेशाने शिक्षक असलेल्या मार्कंडी चावरे वय 48 वर्षे यांचे घर ताडाळा मार्गावर आहे, सत्यजित वाळके हे लेऑऊटमधील खुल्या जागेवर घराचे बांधकाम केल्याच्या आरोपावरून चावरे आणि वाळके कुटुंबियांमध्ये नेहमीच वाद होत आहेे, मूल पोलीस स्टेशन मध्ये याआधीही दोन्ही कुटुंबियांनी एकमेकांविरूध्द तक्रार दिलेली आहे. दरम्यान 21 सप्टेंबर रोजी अर्चना मार्खंडी चावरे हया घराबाहेर असतांना सत्यजित वाळके हे दुचाकीने त्याठिकाणी येेवुन अर्चना चावरे यांचा विनयभंग केल्याने त्यांनी घरात असलेले पती मार्खंडी चावरे आणि मुलगा राहुल चावरे, मार्गनवार यांना बोलावुन सत्यजित वाळके यांना मारहाण केले, तर पतीला होत असलेली मारहाण पाऊन भांडण सोडविण्यासाठी आलेल्या सुनदा वाळके यांनाही मारहान करून विनयभग केल्याची तक्रार दोन्ही कुटुंबियांनी मूल पोलीस स्टेशन दिली. सत्यजित वाळके हे निवृत्त पोलीस आहेत तर अर्चना चावरे हया राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मूल शहराध्यक्ष आहेत. यादोघांमध्ये झालेली फ्रि स्टाईल मूल शहरात चर्चेचा विषय ठरत आहे. crime # Police#Teacher
सुनंदा सत्यजित वाळके यांच्या तक्रारीवरून मार्खंडी चावरे, राहुल चावरे, मार्गनवार आणि अर्चना चावरे यांच्यावर विनयभग आणि अनुसुचित जाती जमाती प्रतिबंधात्मक कायदांयवर गुन्हा दाखल केला आहे तर अर्चना मार्खंडी चावरे यांच्या तक्रारीवरून सत्यजित वाळके व सुनदा वाळके यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी भगत, मूल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुमित परतेकी याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भाऊराव बोरकर करीत आहे. Mul Police