अखेर विरव्हाचे कोतवाल नंदकिशोर खोब्रागडेंचा मृत्तदेहच सापडला dead body was found

Nandkishore Hiraman Khobragade
Nandkishore Hiraman Khobragade

12 सप्टेंबरला झाले होते अपहरण: मूलच्या उमानदीमध्ये मिळाला मृत्तदेह

मूल (प्रतिनिधी): मागील 10 दिवसांपासुन अपहरण केलेल्या विरव्हाचे कोतवाल नंदकिशोर हिरामण खोब्रागडे यांचा मृत्तदेह आज रविवारी (ता. 22 सप्टेंबर) मूलच्या उमानदीमध्ये सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. Kotwal Nandkishore Hiraman Khobragade of Virva

चावरे-वाळके मध्ये झाली फ्रि स्टाईल molestation

सिंदेवाही तालुक्यातील मौजा विरव्हा येथील कोतवाल नंदकिशोर हिरामण खोब्रागडे हे मागील अनेक दिवसांपासुन सिंदेवाही येथील मदनापूर वार्डात राहात होते. रेती पाहिजे असल्याचा बहाणा करून दोन अज्ञात व्यक्तीनी त्यांना दुचाकीवरून नेत अपहरण केल्याची माहिती कुटुंबियांनी सिंदेवाही येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगीतले. Sindewahi taluka

10 दिवस लोटुन नंदकिशोर परत न आल्याने कुटुंबियांमध्ये चिंतेचे वातावरण पसरलेले होते. दरम्यान रविवारी (ता. 22 सप्टेंबर) रोजी सकाळी मूलच्या उमानंदीमध्ये त्यांचा मृत्तदेह आढळुन आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मृत्तदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रूग्णालय मूल येथे पाठविण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.