अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा दिला इशारा
संगिता गेडाम, मूल
तालुक्यातील चिंचोली येथील देवाजी राऊत यांच्यावर वाघाने हल्ला करून नुकतेच ठार केले. सदर शेतकऱ्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरीत समाविष्ट करावे, वाघाचा त्वरित बंदोबस्त करावा व शेतकऱ्यांना झटका मशीन 7 दिवसाच्या आत उपलब्ध करून द्यावा अशी मागणी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोषसिह रावत यांनी केली आहे. Rawat’s demand settlement of the tiger
गेल्या अनेक महिन्यापासून मूल तालुक्यातील अनेक व्यक्तीवर वाघाने हल्ला करून ठार केलेले आहे. मात्र वनविभाग थोडीफार मदत करून चूप बसत आहे, वन्यप्राण्याचा बंदोबस्त करीत नसल्याने एका दिवसाआड एका निष्पाप व्यक्तीचा जीव जात आहे याला सर्वस्वी वनविभाग दोषी आहे. यामुळे वनविभागाने वाघाच्या हल्यात ठार झालेल्या कुटुंबियांतील एका व्यक्तीस शासकीय नोकरी समाविष्ट करावे अशी मागणी रावत यांनी वनविभागाकडे केली आहे. dewaji raut tiger attack
मूल तालुक्यात मोठया प्रमाणावर शेतकरी राहतात. शेती करून कुटुंबाचा गाळा हाकलणाऱ्या शेतकऱ्यांना शेतावर गेल्याशिवाय पर्याय नसतो, शेती करण्यासाठी जनावरांची उपजीविका करण्यासाठी शेतावर जनावराना घेऊन जावे लागते अश्या वेळेस त्यांच्यावर वाघ व वन्यजीवाकडून हल्ला होत असून मृत्यूमुखी पळत आहे. यामुळे कुटुंबावर मोठा आघात होत आहे. घरचा कर्ता व्यक्तीचा जीव जात असल्याने संपूर्ण कुटुंब वाऱ्यावर येत आहे, यामुळे वनविभागाने वाघाचा तात्काळ बंदोबस्त करावा, शेतकऱ्यांना झटका मशीनचे वाटप करावे अशी मागणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकारी, मुलचे वनपरिक्षेत्र अधिकारी यांना केली आहे.Chicholi Mul
दोन दिवसापूर्वी वाघाच्या हल्यात ठार झालेल्या चिंचोली येथील देवाजी राऊत यांच्या कुटुंबियांची रावत यांनी भेट घेऊन यांचे सांत्वन केले व आर्थिक मदत केले. यावेळी रावत यांनी येत्या आठ दिवसांत मागणी पूर्ण न केल्यास तीव्र आंदोलन करणार असा खंबीर इशाराही यावेळी दिला.Warning to Forest Department
यावेळी मूल बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार, कांग्रेस जिल्हा महासचिव घनश्याम येनुरकर, विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे संचालक विवेक मुत्यलवार, सामाजिक कार्यकर्ते सुरेश फुलझेले, अतुल गोवर्धन, संदीप मोहबे, पोलिस पाटील श्रीकृष्ण चचाने, मनोज ठाकरे, साईनाथ मंगाम उपस्थित होते