मूल पोलीस स्टेशन आणि तहसीलदारांकडे तक्रार
मूल (प्रतिनिधी) : गेल्या अनेक दिवसांपासुन सुरू असलेल्या अवैध दारूविक्री मुळे राजोलीतील नागरीकांना नाहक त्रास करावा लागत आहे, मात्र मूल पोलीसांनी अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई करण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने, संतप्त झालेल्या महिला पुरूषांनी मूल पोलीस स्टेशन Mul Police Station येथे येवुन आपली आपबिती सांगुन अवैध दारूविक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.
मूल तालुक्यातील राजोली येथे तिन ते चार महिला, पुरूष अवैध दारूविक्री करीत आहे, मूल येथील परवानाधारक देशी दारूविक्रेत्यांकडुन राजोली येथे पोहोचता करून दिल्या जात आहे, कुणाचीही भिती नसल्यासारखे व दारूविकण्याचा परवाना असल्यासारखे अवैध दारूविक्री करीत असल्याने राजोलीकरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पहाटे पासुन तर रात्रौ बेरात्रौ पर्यत अवैध दारूविक्री होत असल्याने शाळकरी मुलांनाही याचा त्रास होत आहे. Rajoli
अवैध दारूविक्रेत्यांच्या घरापुढे दुचाकी वाहनाच्या रांगा लागत असल्याने ये-जा करणाऱ्यांना याचा सामना करावा लागत आहे. यामुळे राजोली येथील नागरीकांनी मूल पोलीस स्टेशन आणि तहसील कार्यालयात जावुन निवेदन दिले व तात्काळ अवैध दारूविक्री बंद करण्याची मागणी केली.
यावेळी कुंदा आत्राम, संगिता उईके, कमल सोयाम, कालीदास गेडाम, उमेश सोयाम, जिवन रामटेके, विशाल उईके, सुनिल लेनगुरे, श्यामसुंदर आत्राम, दिपक गोडे, सपना सोयाम, माया रामटेके, गिता टेकाम, माया मुट्ठावार, मंजुषा आत्राम, शेवता रामटेके, रेखा मरस्कोल्हे, अनुसया सोयाम, मनिषा उईके, मिरा चौधरी, दुर्गा लेनगुरे, संदिप रणदिवे, माया झोडे, निता आत्राम, रविंद्र रामटेके, पवन सोयाम, मनिषा सोसाम, देवता आत्राम, आशिष चौधरी, विकास मुट्ठावार, राजु उईके रोशन रामटेके यासह मोठया संख्येने गावकरी उपस्थित होते.