शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जनविकास सेनेचा मूल तहसील कार्यालयावर मोर्चा

JanVikas Sena march on Mul Tehsil Office
JanVikas Sena march on Mul Tehsil Office

पाटबंधारे व आसोलामेंढा प्रकल्प कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी मोर्चेकऱ्यांना दिले लेखी आश्वासन

मूल (तालुका प्रतिनिधी): निकृष्ठ आणि नियमाला डावलुन केलेल्या पाईपलाईनच्या कामामुळे उभा शेतातील पिकांना पाणी पुरवठा होत नसल्याने संतप्त शेतकर्यांनी आज जनविकास सेनेच्या नेतृत्वात उपविभागीय कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. JanVikas Sena march on Mul Tehsil Office

जनविकास सेनेचे संस्थापक पप्पू देशमुख यांचे नेतृत्वात निघालेल्या मोर्चात शेकडोच्या संख्येत शेतकरी सहभागी झालेत. मोर्चा उपविभागीय कार्यालयावर नेल्यानंतर, अचानक मोर्चाने सिंचन विभागात धडक दिल्यांने, सिंचन विभागातील अधिकार्यांची चांगलीच गोची झाली.pappu Deshmukh

शासनाने 2019 मध्ये भूमीगत बंद नाली प्रणाली अंतर्गत पाईप लाईन टाकण्यांचे तसेच व्हॉल्व लावण्याचे अंदाजे 23.47 कोटी रूपयो काम एन. एन. के. कन्स्ट्रक्शन पुणे यांचे मार्फतीने केले. या कामाच्या पूर्णत्वानंतर, चिचाळा, ताडाळा, दहेगांव, हळदी, मानकापूर, वेडी रिठ, गोठणगांव रिठ या 7 गावातील शेतकर्यांच्या शेतात सिंचनाची सोय होणार होती. मात्र या कामात गैरव्यवहार झाल्यांने काम नित्कृष्ट दर्जाचे झाले आणि ठिक-ठिकाणी पाईप फुटणे, चुकीच्या नियोजनामुळे पाणी शेतापर्यंत न पोहचणे यामुळे शेतकरी हवालदिल झालेत. या समस्यांकडे शेतकर्यांनी लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांचे लक्ष वेधले, मात्र त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यांचा आरोप देशमुख यांनी मोर्चात बोलतांना केले.

सदर योजनेतील भ्रष्टाचाराची उच्चस्तरीय चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधीत अधिकारी, कंत्राटदार यांच्यावर कारवाई करावी, योजनेतील फुटलेली पाईपलाईन तातडीने दुरूस्त करण्यात यावे, सदर योजनेचे नव्याने सर्व्हे करून शेतजमिनीचा नैसर्गिक उतार विचारात घेवुन अधिकाधिक जमिन सिंचनाखाली येईल त्यादृष्टीने व्हॉल्व लावण्यात या कामाची संपूर्ण चौकशी करावी, या चौकशीचा अहवाल सादर करावा व गैरव्यवहार करणार्यांवर कारवाई करावी अशी मागणी पप्पु देशमुख यांनी केली. Officials of Irrigation and Asolamendha Project Office gave a written assurance to the marchers

यावेळी जनविकास सेनेच्या उपाध्यक्षा छायाताई सिडाम, घनश्याम येरगुडे, इमदाद शेख, प्रफुल बैरम, अमोल घोडमारे, भुमिपुत्र पाणी वाटप सहकारी संस्थेचे अध्यक्ष चलदेव मांदाळे, सचिव विलास लेनगुरे, मुकेश गांडलेवार, धुडीराज बोप्पावार, संजय गेडाम, रमेश आंबोरकर, बंडु बुरांडे, महेश चिचघरे, हळदी येथील पाणी वाटप संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र कोठारे, ताडाळा येथील पाणी वाटप संस्थेचे अध्यक्ष शिलाबाई दहिवले, रमेश लेनगुरे यांच्यासह मोठया संख्येने शेतकरी उपस्थित होते. Demand high-level inquiry into corruption

यावेळी मूल येथील पाटबंधारे व सावली येथील आसोलामेंढा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता ए. एस. पिदुरकर, उपविभागीय अभियंता राजु बोडेकर, पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता अखिलेश सिंग यांनी सदर मागणी बाबत तात्काळ कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिले. यामुळे मोर्चा स्थगीत करण्यात आला.