जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष संध्याताई गुरनुले यांची पत्रकार परिषदेत माहिती
मूल (प्रतिनिधी) : येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील एका महिला कर्मचाऱ्याचे लैंगिक अत्याचार केल्याप्रकरर्णी तत्कालीन तालुका कृषी अधिकारी प्रशांत कासराळे यांच्यावर निलंबनाची कारवाई महाराष्ट्र शासनाच्या कार्यासन अधिकाऱ्यांनी केल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा संध्याताई गुरनुले यांनी पत्रकार परिषदेत दिली. Prashant Kasrale
मूल येथील विश्राम गृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत संध्याताई गुरनुले पुढे म्हणाल्या की, मूल येथील तत्कालीन कृषी अधिकारी प्रशांत कासराळे यांनी लैगिक अत्याचार करीत असल्याची तक्रार मूल येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील एका महिला कर्मचाऱ्यांनी मूल पोलीस स्टेशन येथे 17 मे रोजी केली होती, सदर महिला कर्मचाऱ्यांने माझेकडेही तक्रार देवुन न्याय मिळवुन देण्याची मागणी केली होती, त्यासोबतच जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधिक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार दाखल केली होती, सदर विषय मी स्वतः जिल्हाचे पालकमंत्री तथा राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे याबाबत पाठपुरावा करून तालुका कृषी अधिकारी प्रशांत कासराळे यांना निलंबीत करण्याची मागणी रेटुन धरली, त्यानंतर जिल्हाचे पालकमंत्री नाम. सुधीर मुनगंटीवार यांनी १ ९ मे रोजी कृषी मंत्री नामदार धनंजय मुंडे यांच्याकडे निलंबनाची मागणी केली, दरम्यान जिल्हाधिकारी, आणि कृषी विभागाने केलेल्या चौकशी अहवाल शासनाकडे प्राप्त होताच, कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग मंत्रालयांने प्रशांत कासराळे यांच्याविरूध्द 14 ऑगष्ट रोजी तात्काळ निलंबित केले. ही माहिती संध्याताई गुरनुले यांनी यावेळी पत्रकार परिषदेत दिली. Mul Taluka Agriculture Officer
सदर आदेशात प्रशांत कासराळे यांचे मुख्यालय विभागीय कृषी सहसंचालक नागपूर विभाग नागपूर राहणार असुन विभागीय कृषी सहसंचालक नागपूर विभाग नागपूर यांच्या पुर्वपरवानगी शिवाय मुख्यालय सोडता येणार नसल्याची माहिती संध्याताई गुरनुले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला महिला आघाडीच्या वंदनाताई शेंडे, मूल पंचायत समितीचे माजी उपसभापती अमोल पाटील चुधरी, सामाजिक कार्यकर्ते लोकनाथ नर्मलवार, आकापूरचे उपसरंपच साहिल येनगंटीवार, नांदगावचे माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य प्रशांत बांबोळे, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक विपीन भालेराव, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कोहळे उपस्थित होते.