मूल तालुक्यातील येथील घटना
मूल (प्रतिनिधी): शेळी चराईसाठी घेवुन गेलेल्या शेळीपालकावर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना चिचपल्ली वनविभागाच्या मूल Mul येथील कक्ष क्रं. 752 मध्ये घडली. मुनीम रतीराम गोलावार वय 41 वर्षे रा. चिचाळा Chichala असे वाघाच्या हल्लात ठार झालेल्या शेळीपालकाचे नांव आहे. Munim Golawar
मूल तालुक्यातील चिचाळा येथील मुनीम रतीराम गोलावार वय 41 वर्षे यांनी घरीच शेळीपालन करीत होते. सदर शेळयाना ते वनपरिक्षेत्र चीचपल्ली उपक्षेत्र मूल येथील कक्ष क्रमांक ७५२ मध्ये रविवारी शेळ्या चराईसाठी नेेले होते, दरम्यान दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करून ठार केले. रात्रौ होवुनही मुनीम घरी परत न आल्याने कुटुंबियांनी गावकऱ्यांना माहिती दिली. गावकऱ्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. माहितीच्या आधारे विभागीय वनाधिकारी प्रशांत खाडे, चिचपल्लीच्या वनपरिक्षेत्राधिकारी प्रियांका वेलमे यांच्या आदेशानुसार सोमवारी सकाळी मूलचे क्षेत्र सहाय्यक मस्के, जानाळाचे वनरक्षक राकेश गुरनुले, सूधिर ठाकुर, पवन येसाम्बरे, शितल चौधरी, शुभांगी गुरनुले, चंद्रपूर येथील अतीशिघ्र कृती दलचे कर्मचारी व संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य प्रशांत मुत्यारपवार, दिनेश खेवले, अंकुश वाणी, रीतेश पीजदूरकर, प्रतीक लेनगुरे, हौशीक मंगर, यांनी शोध मोहीम राबवली असता जंगलात मुनीम गोलावार याचा मृतदेह आढळुन आला. यावेळी वनविभाग व पोलीस प्रशासनामार्फत घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. Chichpalli Forest Department
यावेळी मृतकाच्या पत्नीला चिचपलली वनविभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी प्रियंका वेलमे यांचे हस्ते 50 हजार रूपयाची आर्थीक मदत देण्यात आली. Priynka Velme यावेळी महादवाडीचे क्षेत्र सहाय्यक पि. डी. खनके, केळझरचे क्षेत्र सहाय्यक महादवाडी पि. डब्लू.पडवे, संजीवन पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष उमेशसिंह झिरे, जानाळाचे वनरक्षक आर. जे. गुरनुले व मृतकाचे नातेवाईक उपस्थित होते…