वरोरा विधानसभेची निवडणुक लढण्यास मिनलताई आत्राम इच्छुक Assembly Election

Minaltai Atram
Minaltai Atram

शिवसेना नेते, मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचेकडे केली मागणी

चंद्रपूर (प्रतिनिधी): जिल्हयातील वरोरा विधानसभा ७५  शिवसेना पक्षाचे गड आहे, या विधानसभा क्षेत्रामध्ये  बाळासाहेब ठाकरे यांना माणनारा कट्टर हिंदुत्ववादी मतदार आहे. शिवसेना पक्षाचे संघटन तसेच महिलांचे संघटन मजबुत असुन या क्षेत्रामध्ये कार्यकत्यांची खुप मोठी फळी असून या विधानसभा क्षेत्राची उमेदवारीची मागणी मिनलताई आत्राम यांनी शिवसेना पक्षाचे नेते एकनाथजी शिंदे यांचेकडे केली आहे. Minaltai Atram willing to contest assembly elections

भद्रावती नगर पालीकेच्या माजी नगराध्यक्ष तथा तिन टर्ममध्ये नगरसेविकेचे पद भुषविलेल्या मिनल ज्ञानेश्वर आत्राम यांनी शिवसेना नेत्यांकडे विधानसभेची निवडणुक लढण्यास इच्छुक असुन उमेदवारी देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
दिलेल्या निवेदना म्हटले आहे की, मी भद्रावती येथील असून आदीवासी समाजाची मुलगी आहे. गेल्या ३० वर्षापासून शिवसेना पक्षाचे एकनिष्ठ काम करीत आहे, शिवसेना पक्षाची कट्टर शिवसैनिक महिला कार्यकर्ती आहे, मी भद्रावती नगर पालीकेची माजी नगराध्यक्षा असून तिन वेळा नगरसेवक म्हणुन निवडून येत आहे व विद्यमान नगरसेविका आहे. नगराध्यक्ष पदाव्या कारकीर्दीमध्ये भद्रावती शहराचा सर्वांगीन विकास केलेला आहे. पक्षपात किंवा भेदभाव न करता सर्वाना सोबत घेवुन शहराचा विकास केला आहे. Warora-Bhadravati Assembly

भद्रावती-वरोरा शहरामध्ये शिवसेना पक्षाचे अनेक आंदोलन केले आहे. विविध प्रकारचे कार्यक्रम घेऊन महिलांचे संघटन मजबूत केले तसेच महिलांचे मेळावे घेतले व महिलांचे सबलीकरण करण्यासाठी मदत केली. या विधानसभेमध्ये माझा दांडगा जनसंपर्क असून आता परत एकदा शिवसेना पक्षाने मला शिवसेना जिल्हा प्रमुख महिला आघाडी चंद्रपूर या पदाची जबाबदारी दिली असुन यामुळे पक्षाचे कार्यक्रम घेणे, संकटकाळी नागरीकांना मदत करण्याचे काम करीत असल्याने परत जनसंपर्क वाढला आहे मला पक्षाले दिलेली जबाबदारी योग्यरित्या पार पाडत असून चंद्रपूर जिल्हयात संपूर्ण तालूका प्रमुख व शहर प्रमुख महिलांच्या नियुक्ती करुन महिलांचे संघटन, मजबूत फळी तयार केली असुन ते माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. भद्रावती वरोरा विधानसभा क्षेत्रातला शिवसैनिक कार्यकर्ता व पदाधिकारी याचा पाठींबा असुन माझ्या सोबत खंबीरपणे उभे आहे.

वरोरा-भद्रावती विधानसभा ७५ या क्षेत्रातील आदिवासी समाज माझ्यासोबत असून मी आदिवासी समाजाची विदर्भ महिला अध्यक्ष यापदावर काम करीत आहे. दलित, ओ.बी.सी व ईतर समाज माझ्या सोबत असून सर्व जनतेचा पाठींबा असल्याने विधानसभा निवडणुकीत मोठया मताची लीड घेऊन निवडून येवु शकतो यामुळे भद्रावती वरोरा विधानसभेची उमेदवारी देण्याची मागणी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष मिनल आत्राम यांनी शिवसेना नेते, राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांचेकडे केलेली आहे.