शिक्षण प्रसारक मंडळ मूलचे अध्यक्षपदी अॅड. अनिल वैरागडे तर सचिवपदी शशीकांत धर्माधिकारी यांची निवड Shikshan Prasarak Mandal

Shikshan Prasarak Mandal
Shikshan Prasarak Mandal

भोजराज गोवर्धन, मूल 
चंद्रपूर जिल्हयातील नामांकीत शिक्षण संस्था, शिक्षण प्रसारक मंडळ मूलची नवीन कार्यकारीणीच्या निवडणूकीत अध्यक्षपदी अॅड. अनिल वैरागडे यांची अविरोध निवड करण्यात आली. सचिव पदासाठी झालेल्या निवडणूकीत शशीकांत धर्माधिकारी यांनी अजय वासाडे यांचा पराभव करीत विजय मिळविला. Ad. Vairagade, Shashikant Darmadhikari

सर्वोच्च न्यायालयाचे आदेशानुसार धर्मदाय आयुक्त यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आज निवडणूक घेतली त्यात शिक्षण प्रसारक मंडळाचे नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

अध्यक्ष पदाकरीता अॅड. अनिल वैरागडे, उपाध्यक्ष पदाकरीता अॅड. प्रणव वैरागडे, अजय वासाडे, सहसचिव पदाकरीता प्राचार्य ते.क. कापगाते यांचे विरोधात कुणीही उमेदवारी दाखल न केल्यांने, ही सर्व पदे अविरोध निर्वाचित झाली होती. कार्यकारी सदस्य म्हणून  प्रभाकर पुल्लकवार, सौ. वैशाली वासाडे यांची आज अविरोध निवड करण्यात आली.

सचिव पदासाठी शशीकांत धर्माधिकारी व अजय वासाडे यांचे दोन उमेदवारी अर्ज आल्यांने निवडणूक घेण्यात आली, त्यात शशीकांत धर्माधिकारी यांनी 8 विरूध्द 4 मतांनी अजय वासाडे यांचेवर विजय मिळविला.

मागील 26 वर्षापासून शिक्षण प्रसारक मंडळात सुरू असलेल्या अंतर्गत वादावर या निवडणूकीने कायमचा पडदा पडला असून, मूल तालुक्यात शैक्षणिक विकास आता संस्थेच्या वतीने जोमात करण्यात येईल असा विश्वास नवनिर्वाचित अध्यक्ष अॅड. वैरागडे यांनी व्यक्त केले.

शिक्षण प्रसारक मंडळ मूलच्या वतीने मूल व सावली तालुक्यात विविध विद्यालय, महाविद्यालय व छ़ात्रालये चालविली जातात. या संस्थेत 1998 पासून अंतर्गत वाद होते. हे वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहचले. अखेर सर्वोच्च न्यायालयाने एसएलपी 10846/2018 या दाव्यावर दिनांक 23.1.2024 रोजी अंतिम निर्णय देत, 2002 ते 2007 ची कार्यकारीणी वैद्य ठरवित, सहा महिण्यांचे आत सह. धर्मदाय आयुक्त यांनी नविन कार्यकारीणीसाठी निवडणूक घ्यावी असे आदेश दिले. या आदेशानुसार दिनांक 17 जुलै 2024 रोजी पंचायत राज प्रशिक्षण केंद्र मूल येथे निवडणूक घेण्यात आली.

शिक्षण प्रसारक मंडळ मूलचे संपूर्ण अधिकार अॅड. वासाडे कुटूंबियांकडे रहावे याकरीता सौ. वैशाली वासाडे व त्यांचे तीनही मुलांनी अथक प्रयत्न केले, मात्र त्यांना त्यात यश आले नाही. मुलांच्या हट्टापायी अॅड. वासाडे यांना या संस्थेवरील अधिकार गमवावे लागले अशी चर्चा आता जनमानसात सुरू आहे.