17 जनावरे ठार
संगिता गेडाम, मूल : गडचिरोली मार्गावर मूल पासून दोन किलोमीटर अंतरावरील आकापूर गांवालगाच्या वळण मार्गावर जनावर कोंबून भरधाव वेगात जात असताना चालकाचे ट्रक वरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात सतरा जनावर घटनास्थळी मृत्यूमुखी पडल्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली. An accident involving a truck carrying animals
गोवंश हत्या आणि तस्करी यावर पोलीस प्रशासन करडी नजर ठेवून मोठ्या प्रमाणात कारवाई करीत आहेत. असे असताना अनेक गोवंश तस्कर प्रशासनाच्या डोळ्यात धुळ झोकुन सर्रासपणे गोवंश तस्करी करीत असल्याची घटना घडलेल्या अपघातामूळे उघडकीस आली. गोवंशाची तस्करी करणारा ट्रक क्रमांक सीजी-०७-सीबी ०७१७ गडचिरोली वरून मुल मार्गे हैदराबाद कडे जात असताना आकापुर लगतच्या उमा नदी वळण मार्गाखाली उतरला. घटनेच्या वेळेस गोवंशाची तस्करी करणारा ट्रक कदाचित भरधाव वेगात असावा शिवाय पावसामुळे मार्ग ओला असल्याने वळण मार्गावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि भरधाव ट्रक रोड खाली उतरून अपघात झाला. झालेल्या अपघाता मुळे सतरा जनावर घटनास्थळीत मृत्यू पावले. Mul Akapur
घटनेची माहिती होताच मूल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत ट्रक चालक व वाहक घटनास्थळावरून पसार झाले होते. पोलिसांनी नागरिकांच्या सहकार्याने मृत जनावरांना ट्रक मधून काढून पशुवैद्यकीय अधिकारी यांचे मार्फत शवविच्छेदन करून दफन केले. अपघाताचे वेळेस ट्रकमध्ये तीस ते पस्तीस जनावर असावे अशी चर्चा आहे. मूल पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला असून पुढील तपास मूल पोलीस करीत आहे.