चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक accident

Apghat
Apghat

एक जण जागीच ठार एक जण गंभीर जखमी : मूल तालुक्यातील घटना

संगिता गेडाम, मूल
सावली येथील नातेवाहीकांना भेटुन वरोरा येथे जात असताना मूल जवळील उमानदीच्या वळणावर बोलोरो पिकअप वाहनाने धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाल्याचे घटना शुक्रवारी रात्रौ 9.30 वाजता दरम्यान घडली. निलेश गेडाम वय 35 वर्षे रा. वरोरा हा जागीच ठार झाला तर संदिप अशोक पासलबंशी वय 27 वर्षे रा. वरोरा असे गंभीर जखमी युवकाचे नांव आहे. Nalesh Gedam, Sandip Pasalbanshi Warora

वरोरा येथील निलेश गेडाम व संदिप पासलबंशी हे एम एच 34 ए वाय 7931 या दुचाकीने सावली येथील नातेवाहीकांना भेटण्यासाठी शुक्रवारी आले होते, रात्रौ वरोरा येथे जाण्यासाठी निघाले असता मूल वरून गडचिरोलीकडे जाणाऱ्या  बोलोरो पिकअप वाहनाने दुचाकीला जबर धडक दिल्याने निलेश गेडाम हा जागीच ठार झाला, तर संदिप पासलबंशी हा युवक गंभीर जखमी झाला आहे. बोलोरो पिकअप वाहन चालकाने सदर वाहने घटनास्थळावरून घेवुन पसार झाला., सदर घटनेची माहिती मूल पोलीस स्टेशन येथील कर्मचाऱ्यांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होवुन जखमींना मूल उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. accident

मूल पोलीस स्टेशन येथे बोलोरो वाहन चालकावर कलम 304, 279, 338 भांदवी, 134, 184 मोबाका अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी भगत, पोलीस निरीक्षक सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक अनुप मेश्राम हे करीत आहे. Mul Police Station