संजय पडोळे यांना जीवे मारण्याची धमकी मूल तालुका पत्रकार संघातर्फे निषेध

Taluka Patrakar Sangh Mul 
Taluka Patrakar Sangh Mul 

‘त्या‘कॉंग्रेस नेत्याविरूदध कारवाई करा – मागणीचे निवेदन प्रशासनाला सादर

मूल (प्रतिनिधी) :- येथील तालुका पत्रकार संघाचे जेष्ठ सदस्य आणि दै.पुण्यनगरीचे प्रतिनिधी संजय पडोळे यांना कॉंग्रेसच्या एका नेत्याने जीवे मारण्याची आणि परिवाराला संपविण्याची धमकी देण्यात आली.त्या घटनेचा तालुका पत्रकार संघ,मूल तर्फ्रे निषेध करण्यात आला. याबाबत तालुका पत्रकार संघाची तातडीची सभा घेण्यात आली.सभेच्या अध्यक्षस्थनी संघाचे अध्यक्ष राजू गेडाम हे होते.त्यात निषेधाचा ठराव घेण्यात आला. आणि धमकी देणारे कॉंग्रेसचे नेते प्रकाश मारकवार यांच्या विरूदध कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली. या मागणीचे निवेदन मूल येथील उपविभागीय अधिकारी,उपविभागीय पोलिस अधिकारी,तहसिलदार आणि पोलिस निरिक्षक यांना देण्यात आले. Protest on behalf of the Journalists Union

Taluka Patrakar Sangh Mul 1
Taluka Patrakar Sangh Mul 1

पुण्यनगरी मध्ये प्रसिदध झालेल्या एका बातमीच्या संदर्भात कॉंग्रेसचे नेते प्रकाश मारकवार यांनी संजय पडोळे हे आपल्या कर्तव्यावर असताना भ्रमणध्वनी वरून जीवे मारण्याची धमकी आणि परिवाराला संपविण्याची भाषा वापरली. Punyanagari एखादया बातमीच्या संदर्भात वृत्तपत्राच्या बातमीदाराला धमकी देणे म्हणजे वृत्तपत्राच्या स्वातंत्र्यांची पायमल्ली करण्यासारखे आहे. Congress leader Prakash Markwar प्रत्येक बातमीदाराला आपआपल्या प्रकारे लिखाणाचे स्वातंत्र्य आहे.हे स्वातंत्र्य कोणी हिरावून घेत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही.हे अशोभनीय कृत्य आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या वृत्तपत्राच्या प्रतिनिधींना संरक्षण मिळालेच पाहिजे, अशा आशयाचा ठराव पत्रकार संघातर्फे घेण्यात आला.व्यक्ती कोणीही आणि कोणत्याही पक्षाचा का असेना त्याचा निषेध झालाच पाहिजे असे मत उपस्थित पदाधिका-यांनी आणि सदस्यांनी व्यक्त केले. या घटनेचा निषेध करून प्रकाश मारकवार यांच्या विरूदध प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.मागणीचे एक निवेदन मूल येथील उपविभागीय अधिकारी विशाल मेश्राम, तहसिलदार मृदूला मोरे आणि पोलिस निरिक्षक यांना देण्यात आले. Taluka Patrakar Sangh Mul

Taluka Patrakar Sangh Mul 2
Taluka Patrakar Sangh Mul 2

सभेला आणि निवेदन देताना पत्रकार संघाचे अध्यक्ष राजू गेडाम,उपाध्यक्ष युवराज चावरे ,सचिव विनायक रेकलवार, गुरू गुरूनूले, चंद्रकांत मनियार, वासूदेव आगडे, दीपक देशपांडे, अशोक येरमे, भोजराज गोवर्धन,रविंद्र बोकारे,गंगाधर कुनघाडकर इत्यादी सदस्यगण उपस्थित होते.

चौकशी करण्याचे दिले आदेश
मिळालेल्या धमकी नंतर संजय पडोळे यांनी सावली पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली.याबाबत चौकशीचे आदेश दिले असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी शिवाजी भगत यांनी भ्रमणध्वनी वरून बोलताना मूल तालुका पत्रकार संघाला सांगितले.