भाऊ, आपल्या पराभवाला आपलेच कार्यकर्ते आणि घटक पक्षातील काही नेते जबाबदार? Namdar Sudhir Mungantiwar

Namdar Sudhir Mungantiwar
Namdar Sudhir Mungantiwar

……आता तरी परिक्षण करण्याची गरज

भोजराज गोवर्धन, मूल
लोकसभेची निवडणुक पार पडली, भाजपाचे अनेक वजनदार नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला, यात बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांचाही दारून पराभव झाला, यापराभवाला काही कार्यकर्ते आणि घटक पक्षातील काही नेते जबाबदार असल्याची चर्चा निवडणुक निकाला नंतर होत असल्याने विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने नियोजन करताना परिक्षण करण्याची गरज आहे.

चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभेच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रतिभा धानोरकर मोठया मताधिक्याने विजयी झाल्या. त्यांनी भाजपाचे वजनदार नेते, राज्याचे मंत्री, चंद्रपूरचे पालकमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांचा दारून पराभव केला. विकास म्हणजे नामदार सुधीर मुनगंटीवार अशी ओळख संपुर्ण महाराष्ट्रामध्ये सुधीर मुनगंटीवार यांची आहे. बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचा न भुतो न भविष्यती अशा विकास नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी केलेला आहे. विकासपुरूष नामदार मुनगंटीवार यांचा पराभव होईल अस बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील सुज्ञ नागरीकांना वाटत नव्हते, मात्र नामदार मुनगंटीवारांना जवळपास 48 हजार मतानी पराभव स्विकारावा लागला.

विजय झाला तर माजायच नाही आणि पराभव झाला तर लाजायच नाही असा स्वभाव गुण तनामनात भरलेल्या नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी पराभव मान्य करीत पुन्हा त्याच जोमाने आणि त्याच ताकतीने विकासकामांना सुरूवात केलेली आहे, लोकसभा निवडणुक लढण्यास नामदार मुनगंटीवार इच्छुक नव्हते, मात्र पक्षाने चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राचे उमेदवार म्हणुन सुधीर मुनगंटीवार यांची तिकीट पक्की केल्याने त्यांनी निवडणुकीच्या रणागणात उतरले, खुद्द पतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुधीरभाऊच्या निवडणुक प्रचारासाठी चंद्रपूरात आले होते, मात्र पाणी कुठं मुरलं कुणास ठावुक काही कार्यकर्ते, महायुतीतील काही नेते, कार्यकर्ते पाहिजे त्याप्रमाणात निवडणुक प्रचारात काम केलेले नसल्याचे दिसुन आले.

नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी करोडो रूपयाचा निधी आणुन क्षेत्राचा कायपालट केलेला आहे., तरीही मात्र बल्लारपूर मतदार संघात जवळपास 48 हजार मते कमी मिळाली, याचाच अर्थ महायुतीतील घटक पक्ष आणि कार्यकर्ते कुठं तरी प्रचारात कमी पडले असेच दिसुन येत आहे. यामुळे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत तरी कार्यकर्त्यांचे परिक्षण करूनच निवडणुक प्रचाराचा धुरा सोपविण्याची गरज वाटते.

केवळ कंत्राट मिळविण्यासाठी कार्यकर्ते मागे पुढे
विकासपुरूष सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर विधानसभा क्षेत्राच्या विकासाठी भरीव निधी आणुन क्षेत्राचा विकास केलेला आहे, विकासकामांचा कंत्राट मिळावे यासाठी भाजपाचे काही कार्यकर्ते आणि घटक पक्षातील काही नेते, कार्यकर्ते सुधीरभाऊंच्या मागे पुढे फिरून मी काम केल्याचे भासवुन पोळी शेकुन घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. यामुळे भाऊंनी आता तरी अशा कार्यकर्ते आणि घटक पक्षातील नेत्याबाबत सावध राहण्याची गरज आहे.