कृषी अधिकारी आउट ऑफ कव्हरेज एरिया
मूल (प्रतिनिधी) : गेल्या काही महिण्यापासुन तालुका कृषी अधिकाऱ्याच्या विचित्र वागणुकीमुळे त्रासलेल्या येथील तालुका कृषी कार्यालयातील एका महिला कर्मचाऱ्याने मूल पोलीस स्टेशनला विनयभंगाची तक्रार दिली असून सदर तक्रारीमुळे तालुका कृषी अधिकारी कार्यालयात खळबळ उडाली आहे. सदर महिलेच्या तक्रारीवरून मूल पोलीस स्टेशन येथे शुक्रवारी रात्रौ 10 वाजता दरम्यान गुन्हा दाखल केला आहे. प्रशांत गोविंदा कासराळे असे गुन्हा दाखल केलेल्या अधिकाऱ्याचे नांव आहे. Complaint of molestation at Mul police station
मूल येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात गेल्या काही वर्षापासुन प्रशांत गोविंदा कासराळे हे तालुका कृषी अधिकारी म्हणुन कार्यरत आहेत. याच कार्यालयातील एका महिला कर्मचाऱ्याने मूल पोलीस स्टेशन येथे 17 मे रोजी तक्रार दाखल करून तालुका कृषी अधिकारी प्रशांत कासराळे यांनी विनयंभग केल्याचा आरोप केला आहे. तशीच तक्रार मागील काही दिवसांपुर्वी जिल्हयातील वरिष्ठ अधिकाऱ्याकडेही केली होती मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यानी कारवाई केलेली नसल्याने सदर महिला कर्मचाऱ्याने मूल पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केली होती. A case of molestation has been filed against the taluka agriculture officer
तक्रारीच्या आधारे मूल पोलीस स्टेशन येथे कलम 354 (अ) भांदवी नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास मूलचे उपविभागीय पोलीस अधिकारी एस एस भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुमित परतेकी, पोलीस उपनिरीक्षक ठाकरे करीत आहे.