मूल नगर पालीकेने केली स्ट्रक्चरल ऑडिट ची मागणी
मूल (प्रतिनिधी): अवकाळी पाऊस आणि वादळीवाऱ्यामुळे घाटकोपर येथील महाकाय होर्डिंग कोसळुन 8 जण ठार झाल्याची घटना ताजी असतानाच चंद्रपूर-मूल या राष्ट्रीय महामार्गावरील कर्मविर महाविद्यालयासमोरील जुने होर्डिंग कोसळल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रौच्या सुमारास सदर घटना घडल्याने कोणतीही जिवीत अथवा वित्तहानी झालेली नाही. Chandrapur-Mul National Highway
मुंबईच्या घाटकोपर येथील महाकाय होर्डिंग कोसळुन 8 जण ठार झाल्याची घटना 13 मे रोजी घडली. घडलेल्या घटनेचा संदर्भ देवुन आता संपुर्ण महाराष्ट्रात होर्डिंगच्या परवानगीचा विषय पुढे आलेला आहे. अशातच चंद्रपूर-मूल मार्गावरील कर्मविर महाविद्यालय समोरील जुने होर्डिंग कोसळल्याने मुंबईच्या घाटकोपर येथील घटनेचा संदर्भ ताजा झालेला आहे. आठवडा भरापासुन जिल्हयात वातावरणामध्ये बदल झालेला आहे, कधी पाऊस, कधी वादळ अशी चित्र सध्या पाहायला मिळत आहे. वादळीवाऱ्यामुळेच सदर जुने होर्डिंग कोसळल्याची शक्यता वर्तविली जात आहे. Old hoarding collapsed
शहरातील जुने होर्डिंग धोकादायक आहे त्यामुळे मूल येथील जुने होर्डिंग काडून नवीन होर्डिंग लावणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने नगर पालिकेने प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
नगर पालीका क्षेत्रात 13 होर्डिंग
मूल नगर पालीका क्षेत्रात 13 होर्डिंग आहेत. त्यांचे अजुन तरी स्ट्रक्चरल ऑडिट झालेले नाही, नगर पालीका प्रशासन स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्यासाठी प्रयत्नशिल आहे. काही दिवसात स्ट्रक्चरल ऑडिटची प्रत नगर पालीकेकडे प्राप्त होणार असल्याचे सुत्रानी सांगीतले. 13 hoardings in Mul Municipal Council area