राकेश रत्नावार यांचा आरोप: जिल्हा शल्य चिकीत्सकांना निवेदन सादर
मूल (प्रतिनिधी): येथील उपजिल्हा रूग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचार्याच्या दुर्लक्षपणामुळे विनोद कामडे यांचा मृत्यू झाला असुन, मृत्युस जबाबदार असलेल्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा कॉग्रेसचे जिल्हा महासचिव राकेश रत्नावार यांनी जिल्हा शल्य चिकीत्सकांकडे केली आहे. Sub District Hospital Mul
मूल नगर परिषदेचे माजी नगरसेवक विनोद कामडे यांना 30 नोव्हेंबर रोजी अचानक पोटामध्ये दुखू लागल्याने, त्यांनी सकाळी ९ वाजता येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता त्यांना 12.00 वाजेपर्यंत भरती ठेवले, दुपारी 12.00 वाजता त्यांना डॉक्टरांनी चुकीच्या पद्धतीने उपचार करून घरी पाठविले, मृतक विनोद कामडे यांना चंद्रपूरला रेफर करण्याऐवजी एसिडिटीचा आहे असे सांगून थातुरमातूर उपचार केला. तीव्र वेदना असहृय झाल्याने त्यांना परत दुपारी 4 वाजता उपजिल्हा रूग्णालयात भरती करण्यात आले, मात्र त्रास अधिक असल्यांने त्यांना चंद्रपूरला रेफर करण्यात आले. चंद्रपूरला जातानाच रस्त्यातच विनोद कामडे यांची प्राणज्योत मावळली. मूल उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व आरोग्य कर्मचा-यांने चुकीचा उपचार केले, सकाळीच रेफर केले असते व वेळेवर रूग्णवाहीका उपलब्ध करून दिली असती तर विनोद कामडे यांचा जीव गेला नसता असे निवेदनातून रत्नावार म्हटंले आहे. Take action against doctors and staff: Rakesh Ratnawar’s demand to district surgeons
डॉक्टर व कर्मचा-यांच्या निष्काळजीपणामुळेच विनोद कामडे यांचा जीव गेल्याचा आमचा स्पष्ट आरोप असून याबाबतची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, दोषीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी राकेश रत्नावार यांनी केली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दोषीवार कठोर कारवाई केली नाही तर या विरोधात ग्रामिण रूग्णालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशाराही रत्नावार यांनी दिला.