रूचिका बहुउद्देशीय सामाजिक संस्था व झाशी राणी सांस्कृतिक मंडळाचा स्तुत्य उपक्रम
बल्लारपूर (प्रतिनिधी) : शहरातील विवेकानंद वार्ड झाशी राणी चौक बल्लारपूर येथील रूचिका बहुउद्देशीय सामाजिक संस्था व झाशी राणी सांस्कृतिक मंडळ बल्लारपूरच्या वतिने संविधान दिनाचा कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. Ballarpur
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रुचिका बहुउद्देशीय सामाजिक संस्था बल्लारपूर चे संस्थापक व अध्यक्ष सुमनताई पुरूषोत्तम कळसकर होते. तर प्रमुख अतिथी म्हणुन झाशी राणी सांस्कृतिक मंडळ बल्लारपूर चे अध्यक्ष रोहन जयंत कळसकर, भिम आर्मी बल्लारपूरचे शहर अध्यक्ष शशिकांत निरांजने, ॲड मेघाताई भाले, दिपक पडवेकर, बबलू करमरकर हे उपस्थित होते.
रूचिका बहुउद्देशीय सामाजिक संस्था व झाशी राणी सांस्कृतिक मंडळाच्या वतिने 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन, 15 ऑगस्ट स्वतंत्र दिवस, 14 एप्रिल विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विवेकानंद वार्ड झाशी राणी चौक बल्लारपूर येथे विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते.
कार्यक्रमाचे संचालन संस्था सचिव प्राची प्रदीप झामरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार रतन बांबोळे यांनी मानले. कार्यक्रमाला अशोक मेश्राम, नागेश रत्नपारखी, पुरूषोत्तम कळसकर, प्रदीप झामरे, ॲड. सुमित आमटे, प्रेम नगराळे, आदर्श मेश्राम, शुभांगी बांबोळे, डेशी थॉमस, शांन्टु थॉमस शाहिन शेख, सविता जावादे, शोभा अलोने, माया पडवेकर , मंजुताई नरांजे, सिमरन खोब्रागडे यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते