राजकीय नेत्याने शोधला जुगाराचा नविन ‘‘धंदा’’ Threecard Gambling

Threecard Gambling
Threecard Gambling

राजकीय नेत्याने शोधला जुगाराचा नविन ‘‘धंदा’’

नांदगांव परिसरात थ्रिकार्ड जुगार तेजीत

मूल (प्रतिनिधी): झटपट पैसा कमविण्याच्या लालसेपोटी नादगांव परिसरातील एका राजकीय नेत्याकडुन राजरोषपणे लाखो रूपयांचा जुगार भरविल्या जात आहे. थ्रिकार्ड नावाचा जुगार कधी शेतात तर कधी गावाच्या बाहेर भरविणारा हा नेता येणाÚया जाणाऱ्यासाठी चांगलीच मेजवाणी करीत असल्याने यापरिसरात हप्तातुन 2 दिवस लाखो रूपयाचा जुगार मोठया शौकीनाकडुन खेळविल्या जातो. सदर जुगार अडयावर पोलीस प्रशासनाने धाड टाकुन कारवाई करावी अशी मागणी होत आहे. The police administration should take action against gambling

Threecard Gambling1
Threecard Gambling1

राजकीयदृष्टया संवेदनशिल असलेल्या मूल Mul तालुक्यातील नांदगांव येथे मागील अनेक महिण्यापासुन त्रिकुट नावाचा जुगार भरविल्या जातो, एका राजकीय पक्षाचा स्थानिक नेत्याकडुन थ्रिकार्ड जुगाराचा खेळ शेतात किंवा जवळपासच्या परिसरात भरवित आहे, मूल, पोंभुर्णा तालुक्यासह गडचिरोली जिल्हयातील काही जुगार शौकीन या जुगार अडयावर येवुन थ्रिकार्ड जुगार खेळत असतात, प्रत्येक जुगारावर त्या राजकीय पुढाÚयाला प्रति खेळ 500 रूपये ‘‘फेर’’ दिले जात असल्याने तोही एका दिवसात लाखो रूपये कमवित आहे. जुगार खेळण्यासाठी येणाऱ्या जुगाऱ्याना विदेशी दारूसह, वेज, नॉनवेजची मेजवाणी दिली जात असल्याने याठिकाणी खेळायला येणाऱ्याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, यामुळे गावकऱ्यानाही नाहक त्रास होत आहे. Threecard Gambling

जुगार भरविणाऱ्या त्या राजकीय नेत्याने पोलीस प्रशासनाची धाड पडु नये यासाठी जवळपास 10 ते 12 राखणदार ठिकठिकाणी ठेवुन जुगार भरवित असल्याने पोलीसांचे वाहन नांदगावकडे जाताना दिसताच जुगाराचा खेळ बंद करीत असल्याची चर्चा परिसरात आहे. आठवडयातुन फक्त दोन दिवस याठिकाणी जुगार भरविला जात असुन लाखो रूपयांसह दारूंची गंगाही याठिकाणी मोठया प्रमाणावर वाहत असल्याचे बोलले जाते. पोलीस प्रशासनाने आपली शक्कल लढवुन जुगार अडयावर छापा टाकुन जुगार खेळणाऱ्यासह जुगार अड्डा चालविणाऱ्यावरही कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.