भोजराज गोवर्धन, मूल
4 नोव्हेंबर हा मूल शहरासाठी अतिशय महत्वाचा दिवस. यादिवषी विदर्भातील बौध्द समाजातील बहुसंख्य नागरीक मूलच्या बुध्द टेकडीवर येऊन भेट देतात व बुध्दवंदना म्हटल्याशिवाय परत जात नाही, ज्याठिकाणी बुध्दमुर्ती सरपणासाठी गेलेल्या महिलांना सापडली त्याठिकाणी बुध्द मुर्तीची स्थापना 4 नोव्हेंबर रोजी करण्यात आली, यामुळे 4 नोव्हेबर रोजी वर्धापण दिनानिमीत्ताने मूलच्या बुध्द टेकडीवर विविध कार्यक्रमाचे आयोजन केल्या जाते, याशिवाय दररोज काही नागरीक येवुन बुध्दबंदना घेत असतात, यास्थळाला आता प्रेक्षणीय स्थळाचा दर्जा मिळणे केवळ बाकी आहे. Buddhagiri Mul
कर्मवीर महाविद्यालय मूल जवळ असलेल्या टेकाडीवर 4 नोव्हेंबर 2004 रोजी काही महिला सरपणासाठी गेल्या होत्या. दैनंदिन कामकाजाप्रमाणे आपली कुऱ्हाड एका दगडावर घासत असतांना तो दगड सरकला, त्यावेळी दगडाला पलटवले असता ती मूर्ती असल्याचे दिसले, याबाबत मूल षहरात येऊन सांगितले असता या मूर्तीची वार्ता वाऱ्यासारखी पसरली. सदर मूर्ती पाहण्यासाठी गर्दी जमली. यामूर्तीचे जनत व्हावे यादृश्टीने येथील दि बुध्दीस्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा मूलचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त वनपाल माणिकचंद उराडे यांनी पुढाकार घेऊन वनविभाग व तालुका प्रशासनाला माहिती दिली. व बौध्द बांधवाच्या सहकार्याने याठिकाणी चबुतरा बांधुन विधीवत मूर्तीची स्थापना केली. त्यावेळपासुन टेकाडीवर बौध्द धर्मियाची मूर्तीच्या दर्शनासाठी रिघ लागलेली असते. Mul
सदर बुध्दमूती नवव्या शतकातील सम्राट अशोककालीन असल्याचे बोलले जाते. चंद्रपूरच्या गॅझेटमध्ये या मूल टेकडीची नोंद असल्याचे इतिहास संशोधक टी. टी. जुलमे यांनी त्यावेळी म्हटले होते. तसेच नागपूर येथे 14 ऑक्टोंबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौध्द धर्माची दीक्षा दिली होती, त्यावेळी 15 ऑक्टोंबर 1956 रोजी मूल येथे येत असतांना याच बुध्द टेकडीजवळ थांबुन काही वेळ मौन धारण केले होते.
यास्थळाचे, मुर्तीचे जतन करण्यासाठी तसेच यापरिसराला बुध्द टेकडी म्हणुन सौंदर्यीकरण करण्याच्या दृष्टीने सामाजिक कार्यकर्ते हरीभाऊ तेलंग यांच्या नेतृत्वात बुध्दगिरी बहुउद्देशिय संस्थेची स्थापना करण्यात आली, कालांतराने हरीभाऊ तेलंग यांच्या राजीनाम्यामुळे विजयाताई रामटेके या अध्यक्ष म्हणुन काम पाहात होत्या, त्यांच्यासोबत पुरुषोत्तम साखरे, उपाध्यक्ष, विरेंद्र मेश्राम सचिव तर वनमाला रामटेके कोषाध्यक्ष म्हणुन खांदयाला खांदा लावुन काम करीत होते, त्यानंतर धम्मशिल मेश्राम यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे तर सचिव म्हणुन विजयाताई रामटेके संस्थेचे कार्य बघत आहेत. दरवर्षी याठिकाणी वर्धापण दिनाचा कार्यक्रम मोठया थाटात साजरा केला जातो, भंते संघवंश हे याठिकाणी छोटीशी झोपडी बांधुन 24 तास राहतात. भारतीय बौध्द महासभेच्या वतिने 14 एप्रिल, पोर्णिमा, धम्मचक्र प्रवर्तन दिन, 6 डिसेंबर यासह विविध धार्मीक कार्यक्रम मोठया उत्साहात साजरा केल्या जातो, कार्यक्रमासाठी याठिकाणी 300 स्क्रे. फुटचे बांधकाम सुरू आहे. निसर्गाने नटलेल्या याटेकडीवरून मूल शहराचे दर्शन होते, यामुळे मूलची बुध्द टेकडी विदर्भात प्रसिध्द आहे.