वरोरा (प्रतिनिधी): तालुक्यातील कोसरसार येथील प्रशांत शंकर तडस वय 22 वर्ष याला सावकारी कर्जातून मारहाण करण्याची घटना शुक्रवारी (दि. २७ ऑक्टो.) दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली. Prashant Shankar Tadas from Kosarsar
प्रशांत शंकर तडस वय २२ हा कोसरसार येथील रहिवासी आहे. याच्याकडे सात एकर जमीन असून. दीड वर्षा आधी वडील मृतक शंकर पांडुरंग तडस वय 46 वर्ष यांनी चंद्रपूर येथील रहिवासी एका सावकाराकडुन चार ते पाच लाख रुपयाचे कर्ज घेतले होते, त्या बदल्यात सावकारांनी मृतक शंकर यास चेक दिला होता, हा चेकही बँकेत वठविला असता बाऊन्स झाल्याने व त्या बदल्यात सावकार पुंडलिक यास शेतीची विक्री करुन दिल्याने द्विधा मनस्थितीत असलेल्या शंकर याने एक वर्षांपूर्वी गळफास घेवुन आत्महत्या केली होती, दरम्यान मृतकाचा मुलगा प्रशांत शंकर तडस याने सावकारास घेतलेले चार ते पाच लाख रुपये वापस करून शेती सोडवता यावे यासाठी म्हणून सदर प्रकरण न्यायालयात दाखल केले होते, न्यायालयीन निकाल लागायच्या आधीच शुक्रवारी 27 ऑक्टोबर रोजी चंद्रपूर येथील सावकारानी जवळपास दहा माणसे दोन वाहनांमध्ये भरून कोसरसार गाठल. त्यात सहा ते सात महिला असल्याचे समजते. कोसरसार येथे जातात शेतीच्या मुद्द्यावरून सावकाराने प्रशांत शंकर तडस व त्याची आई या दोघांनाही मारहाण करणे चालू केले, प्रशांत यास दगडाने मारहाण केल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली सदर प्रकरणाची माहिती कळताच गावातील उपसरपंच तसे अन्य नागरीकांनी प्रशांतच्या मदतीला धावून आले. young man was brutally beaten
सदर प्रकरणाची माहिती पोलीस स्टेशन ,शेगाव येथे देण्यात आली असता ठाणेदार मेश्राम यांनी जखमी यास त्वरित प्रथम उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला ,त्यानुसार नागरिकांनी जखमी प्रशांत शंकर तडस व त्याची आई या दोघांनाही उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, वृत्त लीहेस्तोव आरोपींवर कारवाई करण्यात आली नव्हती.