तालुक्यातील विविध प्रकल्पांनाही दिल्या भेटी
मूल (प्रतिनिधी) : कोळसा आणि बोटेझरी येथील नागरीकांचे भगवानपुर येथे पुर्नवसन झालेे, पुर्नवसीत गावातील नागरीकांच्या समस्या जाणुन घेण्यासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी प्रत्यक्ष पुर्नवसीत गावात जाणुन नागरीक आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधला, यासोबत तालुक्यातील विविध प्रकल्पानाही भेट देवुन समाधान व्यक्त केले. Collector’s visit to Bhagwanpur
भद्रावती तालुक्यातील बोटेझरी व चंद्रपूर तालुक्यातील कोळसा येथून प्रकल्पबाधित नागरिकांचे सन 2007 व 2012 यावर्षात मूल तालुक्यातील भगवानपूर येथे पुर्नवसन करण्यात आले. पुर्नवसन झालेल्या गावातील नागरीकांच्या समस्या जाणुन घेण्यासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी शुक्रवारी (दि. 27 ऑक्टो.) दुपारच्या सुमारास भेट देवुन जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी नागरीकांच्या समस्या तात्काळ सोडविण्याच्या दृष्टीने संबधीत विभागाच्या अधिकाÚयांना आदेश दिले.जिल्हाधिकाÚयांच्या भेटी दरम्यान प्रामुख्याने पिण्याचे पाणी, समाज मंदिर, पांदण रस्ते, शहरांना जोडणारे रस्ते, तलावाचे काम, भोगवतदार वर्ग २ जमिनींचे वर्ग १ मध्ये रुपांतर करणे याकामांबाबत नागरीकांशी संवाद साधला. त्यासोबत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट देवुन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. व शाळेत विद्यार्थ्यांना मिळणारे पोषण आहार, पाणी सुविधा, संरक्षण भिंत, मैदान याबद्दलही माहिती घेतली. Collector Vinay Gowda
दरम्यान सावली व मुल एमआयडीसी येथील महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) अंतर्गत कार्पेट निर्मिती आणि प्रशिक्षण केंद्राला भेट देवुन प्रशिक्षण केंद्रामधील महिला प्रशिक्षणार्थींशी संवाद साधला व कार्पेट निर्मितीची प्रक्रिया जाणून घेतली. माविम अंतर्गत मैत्रीण लोकसंचलित साधन केंद्र मुल येथे भेट दिली. त्याठिकाणी बांबूपासून बनवण्यात येणारे वस्तू व प्रक्रिया याबाबत जाणून घेतले. त्यासोबतच एमआयडीसीतील कार्यरत कंपण्याबाबत माहिती घेतली आणि इथेनॉल निर्मिती कंपनी येथे भेट दिली. .
प्रमाणपत्र वाटप शिबीराचे आयोजन
तालुक्यातील भगवानपूर येथील नागरीकांच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने 28 ऑक्टोंबर रोजी भगवानपूर येथे तहसील कार्यालय मुल, चंद्रपूर, भद्रावती व प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय चंद्रपूर च्या वतिने प्रमाणपत्र वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर शिबीरात आदिवासी शबरी घरकुल आवास योजना पात्र लाभार्थ्यांनी व इतर योजना पात्र लाभार्थ्यांनी उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र इत्यादी करिता आवश्यक कागदपत्रे घेऊन उपस्थित राहण्याचे आवाहन मूलचे तहसीलदार डॉ रवींद्र होळी, संवर्ग विकास अधिकारी बी एच राठोड, वन परिक्षेत्र अधिकारी मुल, भगवानपूरचे सरपंच यांनी केले आहे.