शोभाताईंच्या कोणत्या शिष्याला लागणार विधानसभेच्या तिकीटाची लॉटरी? Ballarpur Assembly Election 2024

Ballarpur Assembly Constituency Election 2024
Ballarpur Assembly Constituency Election 2024

बल्लारपूर विधानसभा क्षेत्र निवडणुक 2024

मूल (प्रतिनिधी) : सावली विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी नेहमी झटणाऱ्या माजी मंत्री तथा भाजपाच्या जेष्ट नेत्या शोभाताई फडणवीस यांचे खंदे समर्थक म्हणुन ओळख असणारे कॉंग्रेसचे नेते, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत Santoshsinh Rawat आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष संध्या गुरनुले sandhya Gurnule हया शोभाताईच्या दोन्ही शिष्यांना आता विधानसभेचे वेध लागले असुन निवडणुक लढण्यास इच्छुक आहेत, 2024 मध्ये विधानसभेची निवडणुक होणार असुन त्यासाठी हया दोन्ही मातंब्बर नेत्यांनी आपल्यालाच तिकीट मिळावे यासाठी प्रयत्नशील आहेत. Which disciple of Shobhatai will get the assembly ticket lottery?

भाजपाच्या जेष्ठ नेत्या शोभाताई फडणवीस यांनी मूल-सावली विधानसभेचे सलग 5 टर्म प्रतिनिधीत्व केलेले आहे, त्यांच्या खांदयाला खांदा लावुन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संतोषसिंह रावत आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष संध्याताई गुरनुले यांनी अनेक वर्षे काम केलेले आहे, शोभाताई फडणवीसांचे शिष्य म्हणुन त्यांची ओळख आजही आहे. मात्र परीस्थिती बदलली आणि संतोषसिंह रावत हे माजी खासदार नरेशबाबु पुगलिया यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसमध्ये  प्रवेश करून ते आज कॉंग्रेसवासी झालेले आहे. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष संध्याताई गुरनले हया जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीच्या मूल तालुकाध्यक्ष म्हणुन पक्षाचे काम करीत आहेत. Ballarpur Assembly Constituency Election 2024

5 राज्यातील निवडणुकीचा बिगुल वाजला असुन येत्या वर्षात महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक होणार आहे, त्यादृष्टीने सर्वच पक्षानी आपआपले स्तरावर कामही सुरू केलेले आहे. यासाठी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाकडुन जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत हे बार्शिंग बांधुन आहेत, राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे विश्वासु म्हणुन त्यांची ख्याती आहे, त्यांनी कॉंग्रेस पक्षा कडुन शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी काढलेला अभुतपुर्व मोर्चाही येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाचा मानला जात आहे. त्यामुळे त्यांची निवडणुक लढण्याची तयारी जवळपास निश्चित असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. बल्लारपूर विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व जिल्हयाचे पालकमंत्री तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार करीत आहेत. त्यांनी विधानसभेची जागा सोडुन लोकसभेची निवडणुक लढविली तर बल्लारपूर विधानसभेच्या जागेसाठी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष संध्याताई गुरनुले या उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे बोलले जाते, गेल्या 4 टर्म पासुन त्या जिल्हा परिषदेचे नेतृत्व करीत असल्याने त्यांनीही विधानसभेची तिकीट मिळावी यासाठी प्रयतनशील असल्याचे बोलले जात आहे. यावरून बल्लारपुर विधानसभा क्षेत्राच्या निवडणुकीमध्ये तिकीटाची लॉटरी शोभाताईंच्या शिष्याला लागेल काय? असा सुर ऐकायला मिळत आहे. Shobhatai Fadnvis