महिलांनी घेतला पुढाकार
मूल (प्रतिनिधी): गावातील शांतता अबाधीत राहावी यासाठी तालुक्यातील उश्राळा Ushrala येथील महिला एकत्र येवुन दारूबंदी समिती गठीत करून गावात अवैध दारूविक्री करण्यास बंदी घातली आहे. उश्राळाच्या सरपंच प्रियंका लोकनाथ नर्मलवार Priynka Loknath Narmalwar यांनी दारूबंदीसाठी पुढाकार घेतला आहे, तितक्याच हिम्मतीने गावातील महिलांनी त्यांच्या खांदयाला खांदा लावुन साथ देत असल्याने अवैध दारूविक्रेत्यामध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. Alcohol Prohibition Committee formed
मूल Mul तालुक्यातील मारोडा Maroda परिसरात गेल्या अनेक दिवसांपासुन मोठया प्रमाणावर अवैध दारूविक्री केली जात आहे. मा. सा कन्नमवारांची कर्मभुमी असलेल्या मारोडा आणि जवळपास असलेल्या गावात अवैध दारूविक्री होत असल्याने अनेकांच्या कुटुंबामध्ये शुल्लक कारणावरून वाद होत असल्याने चित्र पाहायला मिळत आहे, यामुळे गावात दारूच येवु नये साठी उश्राळा ग्राम पंचायतच्या सरपंच प्रियंका लोकनाथ नर्मलवार यांनी पुढाकार घेवुन ग्राम पंचायत पटांगणात सोमवारी ( 23 ऑक्टोंबर रोजी) सकाळी 11 वाजता दरम्यान सभा बोलाविले. यासभेला उश्राळा ग्राम पंचायतच्या उपसरपंच उज्वला तुषार ढोले, ग्राम पंचायत सदस्य कर्णवीर राऊत, किरणदास कोरडे, श्रीमती मानकर, श्रीमती जुमनाके, विनोद जिवतोडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सुरेश नेवारे, पोलीस पाटील पुष्पाताई मशाखेत्री यांसह गावातील सुमारे दोनशे महिला उपस्थित होत्या.
यावेळी महिलांनी गावात सुरू असलेली अवैध दारूविक्री संदर्भात चर्चा करून, सदर दारूमुळेे गावातील शांतता धोक्यात आल्याने उश्राळा येथे कोणालाही अवैध दारूविक्री करू दयायची नाही असे सर्वानुमते ठरविण्यात आले. गावात अवैध दारू आणताना कोणी दिसल्यास त्यांला पकडुन पोलीसांच्या स्वाधीन करण्याचेही यावेळी ठरविण्यात आले. यावेळी गावातुन दारूबंदी रॅली गावात जनजागृती करण्यात आली. गावातील महिला एकत्र येवुन अवैध दारूविक्री बंद करीत असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.